कमिशन खोरीमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली - विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार

 0
कमिशन खोरीमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली - विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार

कमिशन खोरीमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली - विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार

औषधांचा तुटवडा, अपुरे मनुष्यबळ, रुग्णसंख्येत वाढ, पायाभूत सुविधा नाही म्हणून निष्पापापांचा बळी जात आहे....

आमदार खरेदी करण्यासाठी पैसे आहेत औषधी खरेदीसाठी नाही, खाजगीकरणाचा बाजार मांडला... आरोग्य यंत्रणेवर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे हि विनंती करण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले...

औरंगाबाद, दि.4(डि-24 न्यूज) 18 ते 35 टक्के कमिशनखोरीमुळे औषधी खरेदीसाठी लवकर निर्णय सरकार घेत नाही, हाफकीन्सकडे पैसे पडून आहे. त्यावर सरकारने प्राधिकरण नेमले आहेत. प्राधिकरण लवकर औषधी खरेदीसाठी निर्णय घेत नाही. कमिशनखोरीमुळे निर्णय लांबणीवर पडत असल्याने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना सरकारच्या अनास्थेमुळे निष्पापापांचा जीव जात आहे. नांदेड व औरंगाबाद येथे मृत्यूचे तांडव सुरू असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पंतप्रधानांना दिल्लीत भेटीला जातात. यांना राज्यातील जनतेशी देणेघेणे नाही. नाराजी दुर करण्यात तीनही सत्ताधारी व्यस्त आहे. सत्ताधारी आमदार सोबत राहावे यासाठी एक एक मतदार संघासाठी पाच पाचशे कोटी रुपये निधी दिला. पन्नास कोटी एका एका आमदारांना कमी दिले असते त्यामध्ये आरोग्य यंत्रणेकडे तो निधी वळवला असता तर नांदेड येथे 41 व औरंगाबाद घाटीत 18 जीव वाचवता आले असते. ठाण्यातील घटनेने या सरकारने बोध घेतला नाही असा घणाघात विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर केला आहे.

आरोग्य यंत्रणेला दोष देण्यात अर्थ नाही यामध्ये शासनच दोषी आहे. औरंगाबाद येथील दिडशे कोटी उभारुन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मणूष्यबळ नाही म्हणून सुरू केले नाही. हे सरकार सर्व सोयी सुविधा युक्त रुग्णालय खाजगी एजंसीला देण्याचा घाट घातला जात आहे. हे रुग्णालय सुरू झाले तर घाटी रुग्णालयाचा ताण कमी होईल. महापालिकेच्या रुग्णालयात साप व कुत्रा चावल्यानंतर रुग्ण घाटीत येतात. मनपा प्रशासनाने यंत्रणा उभारली तर ताण कमी होईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयाने 26 कोटीची मागणी केली मिळाले फक्त दहा कोटी, डिपिसी फंडाचे पाच कोटी अद्याप मिळालेले नाही. का पैसे रोखले जात आहे पालकमंत्री संदीपान भुमरे व आरोग्यमंत्री यांनी उत्तर द्यावे. मनुष्यबळ कमी आहे. 2207 पैकी 1310 अधिकारी व कर्मचारी आहेत. 897 जागा रिक्त आहेत. एवढी मोठी तफावत असताना आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार नाही का.‌..? घाटी रुग्णालयामुळे रुग्णांची आशा आकांक्षा आहे. वर्ग-1

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow