एमआयएमच्या गडात घुमला शिवसेनेचा आवाज, होऊन जाऊ द्या चर्चा कार्यक्रमात चंद्रकांत खैरे यांची टिका

 0
एमआयएमच्या गडात घुमला शिवसेनेचा आवाज, होऊन जाऊ द्या चर्चा कार्यक्रमात चंद्रकांत खैरे यांची टिका

एमआयएमच्या गडात घुमला शिवसेनेचा आवाज, होऊन जाऊ द्या चर्चा कार्यक्रमात चंद्रकांत खैरे यांची टिका

उध्दव ठाकरे यांची मुस्लिम बहुल वार्डात क्रेझ, पण विविध समस्यांवर मुस्लिम समाजाचे शिवसेना नेत्यांना प्रश्न, भाजपा व एमआयएम वर बरसले खैरे...

औरंगाबाद, दि.4(डि-24 न्यूज) एम आय एमचा गड रोशनगेटवर होऊन जाऊ द्या चर्चा हा कार्यक्रम उध्दव ठाकरे गटाच्या वतीने शिवसेनेने कार्यक्रम घेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा आवाज मुस्लिम बहुल वार्डात घुमला. यावेळी भाजपा व एमआयएम वर चंद्रकांत खैरे व संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी जोरदार टीका केली.

मुस्लिम समाजातील महिलांनी अंगणवाडी, महिला आरक्षणावर प्रश्न उपस्थित केला. मुस्लिम आरक्षण व हज हाऊसचे उद्घाटन आतापर्यंत झाले नाही हा प्रश्न उपस्थित करत घाटी रुग्णालयात प्रसुतीसाठी व अन्य उपचारासाठी बाहेरुन औषधी आणावी लागते. परिसरातील खड्डे व पिण्याचे पाणी आठ दिवसाआड मिळते हा सवाल उपस्थित केला. तर एका युवकाने चक्क खैरेंना विचारले आपण एवढी वर्षे लोकप्रतिनिधी होते. 2024 लोकसभा निवडणुकीत उतरणार का...? कोणत्या मुद्यावर निवडणूक लढणार...? हा प्रश्न विचारला असता म्हणाले पक्षाने उमेदवारी दिले तर निवडणूक लढणार आहे. जनता ठरवेल त्या मुद्द्यांवर निवडणूक लढणार पण भाजपा निवडणूक घेण्यास पराभवाच्या भीतीने निवडणूक घेत नाही. अनेक राज्यांतील सरकार केंद्रातील भाजपाने पाडले. आगामी निवडणुकीत खोके सरकार पण सत्तेत येणार नाही. एमआयएमच्या खासदारांनी मतदार संघाचा विकास केला नाही. राज्यात माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मुस्लिम समाजात लोकप्रिय आहे. शिवसेना जात पात मानत नाही राज्याचा विकास सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन करायचे आहे. मोदी सरकारने जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली नाही. महागाई, शेतकरी प्रश्न, बेरोजगारी वाढत आहे. अशा परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला प्रतिसाद मिळत आहे. कोणत्याही परिस्थितीत संविधान वाचवण्यासाठी मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन खैरेंनी यावेळी केले. आगामी महापालिका निवडणुकीत

मजबूत उमेदवार मिळाले शिवसेना उमेदवार देणार, येथील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलन करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी यांनी दिले. संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी यावेळी सांगितले विरोधकांना केंद्रीय संस्था चौकशी लावून बदल्यांचे भावनेचे राजकारण करत आहे. हुकुमशाही सारखे सरकार राज्य करत असल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे घोसाळकर म्हणाले.

आज उबठा गटाकडून रोशनगेट, सिडको, हडको, मयूरनगर, यादवनगर भागातील नागरिकांनी होऊन जाऊ द्या चर्चेत समस्या मांडल्या.

यावेळी रोशनगेट येथे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी, जिल्हाप्रमुख राजूभाऊ राठोड, मा.महापौर नंदकुमार घोडेले, मा.महापौर सुदाममामा सोनवणे, विभागप्रमुख जयसिंग होलिये, बंडू ओक, शेख रब्बानी, विभागप्रमुख वहाब हुसेनी, समीर कुरेशी, आसेफ शेख, शेख नवाज, अजीज शेख, अस्लम शेख, शेख सलीम, सलिम शहा, महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते.

अन्य वार्डात संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी, जिल्हा प्रमुख राजाभाऊ राठोड, उपजिल्हा प्रमुख अनिल पोलकर, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, मा.नगरसेवक किशोर नागरे, स्वाती नागरे, सिताराम सुरे, मोहन मेघावाले आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow