भाजपाचा मतांच्या विभाजनाचा प्रयत्न, महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दिले कमी उमेदवार - इम्तियाज जलील
भाजपाचा मुस्लिम मतांचे विभाजनाचा प्रयत्न, त्यांना सत्तेपासून रोखण्यासाठी दिले कमी उमेदवार - इम्तियाज जलील
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) औरंगाबाद पूर्व मधून मला रोखण्यासाठी मुस्लिम मतांचे विभाजन करण्यासाठी पाच ते दहा लाख रुपये देऊन मुस्लिम उमेदवार उभे केले जात असल्याचा आरोप एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा पूर्वचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी भाजपावर लावला आहे.
पैसे घेऊन उमेदवार उभे राहत असतील तर हे प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार द्यावी लागेल असे जलील म्हणाले.
आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.
राज्यात भाजपा व महायुतीला सत्तेपासून रोखण्यासाठी एमआयएमने राज्यात 288 पैकी फक्त 12 ते 14 उमेदवार उभे केले आहे. जे लोक भाजपाची बी टिम म्हणत होते त्यांना हे उत्तर आहे. जे आता हा आरोप लावतील त्यांचे डोके आणि माझे बुट असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात बेताल वक्तव्य व मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरले गेले आता त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मतांची ताकत दाखवणार असल्याचे त्यांनी सांगितले. दहा वर्षात एमआयएमने केलेली कामे घेऊन मतदारांसमोर जाणार आहे. समोर उमेदवार कितीही येऊ द्या मतदारांना कळते काय करायचे. मतपेटी उघडेल त्यांना कळेल एमआयएमची ताकत काय आहे असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून नासेर सिद्दीकी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले एमआयएमने माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली केलेली कामे व विकासाच्या मुद्यावर मते मागणार आहे. आम्हाला विश्वास आहे मतदार आम्हाला स्विकारतील. सर्व जाती धर्मातील लोकांसाठी कामे केलेली आहे ती कामे आम्हाला या निवडणुकीत कामी येतील व विजय मिळवून देतील असा विश्वास व्यक्त केला. वंचितचे उमेदवार जावेद कुरैशी आणि नासेर सिद्दीकी यांनी एकवेळी एमआयएममध्ये सोबत काम केले एकाच वार्डातील रहीवासी व जुने मित्र आहे. या निवडणुकीत एक दुस-याला पाठिंबा देण्याची वेळ येईल का...जसे किशनचंद तनवानी यांनी माघार घेतली याचे उत्तर देताना सांगितले की वंचितला एमआयएम पेक्षा गेल्या निवडणुकीत कमी मते मिळाली होती. त्यांनी विचार करावा एमआयएमला पाठिंबा द्यायचा किंवा नाही, मतांचे विभाजन होऊ नये यासाठी विरोधात उभे असलेल्या उमेदवारांच्या भेटीगाठी घेऊन सोबत घेण्याचा प्रयत्न करू सोबत आले नाही तर त्यांना लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे निवडणूक लढण्याचा ते लढतील असे शेवटी त्यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हो
ते.
What's Your Reaction?