दुसऱ्या दिवशी भाजपा प्रचार कार्यालयात राडा, सावे कराडांच्या फोटोंची होळी, केनेकरांनी समजूत काढली...
दुसऱ्या दिवशी भाजपा प्रचार कार्यालयात राडा, सावे कराडांच्या फोटोंची केली होळी, केनेकरांनी समजूत काढली...सावे व कराडांना पोलिस बंदोबस्तात बाहेर निघावे लागले...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज) - दुसऱ्या दिवशीही भाजपा प्रचार कार्यालयात महापालिका निवडणुकीत तिकीटे नाही मिळाल्याने इच्छूकांचा राडा पाहायला मिळाला. मंत्री अतुल सावे व राज्यसभेचे खासदार डॉ भागवत कराड यांच्या फोटोंची कार्यकर्त्यांनी होळी केली. अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. आमदार संजय केनेकर यांना मध्यस्थी करावी लागली. त्यांनी नाराज झालेल्या कार्यकर्त्यांसोबत न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला. सी-फाॅर्म दिला जाईल असे आश्वासन दिले. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाला शून्यातून उभे केले त्यांनीच आता नेत्यांविरोधात बंडाचे निशाण फडकावले. शिव्या देत फोटो फाडले. महापालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना निवडून आणणे भाजपा नेत्यांपुढे मोठे आव्हान असणार आहे. यांचे सर्व उमेदवार पडणार असे शाप नाराज झालेले कार्यकर्ते यावेळी देत होते. ज्या कार्यकर्त्यांनी भाजपासाठी लाठ्या काठ्या खाल्ले आंदोलन केले अशा निष्ठावंतांना डावलले. मी कोठे कमी पडलो रडत रडत जमीनीवर मुंडके आपटून एका इच्छूकाने आमदार संजय केनेकर यांच्यासमोर व्यथा मांडली. भाजपा कोणाच्या बापाचा पक्ष नाही मंत्र्यांनी जवळच्या कार्यकर्त्यांना, आयारामांना, पिए व ड्रायव्हरला तिकीट दिले. सुवर्णा मराठे यांनी कडाक्याच्या थंडीत भाजपा कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. अनेक प्रभागांमध्ये विद्यमान नगरसेवकांना डावलून नवख्यांना उमेदवारी दिली त्यांना कोणी ओळखत नाही असे उमीदवार आम्ही निवडून येवू देणार नाही असा संताप नाराज कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. आमदार संजय केनेकर समोर आले दुसरे नेते समोर आले नाही. येथे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली शिविगाळ झाली. एका महीला कार्यकर्त्याने एका कार्यकर्त्याला गालात मारली अशी परिस्थिती कोणत्याही निवडणुकीमध्ये भाजपात पाहायला मिळाली नाही. पोलिसांनी परिस्थिती सांभाळली यामुळे अनर्थ टळला. अतुल सावे यांनी स्वतःच्या पिएला आणि नातेवाईकांना तिकीट वाटल्याचा आरोप महीला कार्यकर्त्यांनी केला. साहेबांच्या घरी येणा-या जाणा-यांसाठी लाखो रुपये खर्च केले. शेवटपर्यंत उमेदवारी देण्याचे लाॅलीपाॅप दिले अशी भावना व्यक्त केली. मी सर्वेक्षणात पुढे होते मग तिकीट कापून सावेंनी पिएला दिले. सावेंनी आत्ताच सर्वे समोर आणावा जर मी मागे असेल तर मी त्यांची जन्मभर गुलामी करेन असे आव्हान भदाने पाटील यांनी दिले. संतप्त कार्यकर्त्यांनी सावेंच्या गाडीला काळे फासले. एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. आता हे बंड कसे शमवणार अजून तर प्राचारालाही सुरुवात झाली नाही प्रभागात त्यावेळी काय परिस्थिती निर्माण होईल यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉ.भागवत कराड यांनी वंजारी समाजाला झुकते माप दिले इतर निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले. असा आरोप कार्यकर्त्यांनी लावला
.
What's Your Reaction?