आमखास मैदानावरील कार्यक्रमाचा उडाला फज्जा...!
आमखास मैदानावरील कार्यक्रमाचा उडाला फज्जा...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) ऐतिहासिक आमखास मैदानावर शासनाच्या अल्पसंख्याक विभाग व उर्दू अकादमीच्या वतीने भव्य दिव्य "दास्तान-ए-दक्कन कार्यक्रमाचे दोन दिवसीय आयोजन करण्यात आले होते. आज सायंकाळी पाच वाजेपासून कार्यक्रमाला सुरुवात होणार होती परंतु मुस्लिम समाजाने नाराजी व्यक्त करत बहिष्कार टाकल्याने रसिकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने फज्जा उडाला. पावसानेही याच वेळी हजेरी लावल्याने खाली खुर्च्या या कार्यक्रमात दिसून आले. उर्दू पत्रकारांसाठी एका तासाचे वर्कशॉपचे सुरुवातीला आयोजन करण्यात आले होते पण दोनच उर्दू दैनिकांचे संपादक या कार्यक्रमात उपस्थित होते. शासनाच्या वतीने अल्पसंख्याक समाजाला खुश करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गजल, मुशायरा, शायरी, सुफी संगित कार्यक्रमासाठी प्रसिद्ध कलाकारांना निमंत्रित करण्यात आले होते परंतु येथे खुर्च्या खाली असल्याने कलाकारांचा सुध्दा हिरमोड झाला.
एकीकडे सरकार मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन कोट्यवधी रुपयांचा चुराडा करत तर दुसरीकडे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मागिल 18 दिवसांपासून बेमुदत साखळी धरणे आंदोलन सुरू आहे. एकही मंत्र्यांनी या आंदोलनाची दखल घेतली नाही किंवा भेट घेऊन काय मागणी आहे याची सुध्दा विचारणा केली नाही यामुळे समाजात नाराजी पसल्याने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला गेला. बाबा रामगिरी व नितेश राणे यांच्यावर अटकेची कारवाई करावी, सुधारीत वक्फ बील रद्द करण्यात यावे, औरंगाबाद नामांतराचा निर्णय मागे घ्यावा. प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या बाबा रामगिरी, नितेश राणे यांना अटक करावी या मागणीसाठी मुंबईत लाखोंच्या संख्येने तिरंगा रॅली काढण्यात आली तरीही सरकार कार्यवाही न करता त्यांना स्वरक्षण देत आहे यामुळे नाराजी आहे म्हणून या कार्यक्रमाचा फज्जा उडाला अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.
What's Your Reaction?