शिंदे सेनेच्या इच्छूकाचा संजय शिरसाट यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन...
शिंदे सेनेच्या इच्छूकाचा संजय शिरसाट यांच्या घरासमोर ठिय्या...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज)- छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत तिकीटे वाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेत राडा बघायला मिळत आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना तिकीटे दिल्याचा आरोप करत पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 20 मधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेले निष्ठावंत कार्यकर्ते सुनील सोनवणे तिकीट नाकारल्याने संतप्त झाले. ज्यांनी आम्हाला कालपर्यंत गद्दार म्हटले त्यांना पक्षात घेवून आम्हाला बाजूला केले जात आहे. असा राग व्यक्त करत संजय शिरसाट यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन सुरू केले. त्यांनी माध्यमांसमोर आपल्या भावना मांडल्या.
गेल्या 20 वर्षांपासून शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. शिंदे साहेबांच्या उठावात आम्ही पहिल्यापासून आहोत. आम्हाला शिंदे साहेब न्याय देतील असे वाटले होते परंतु ज्यांनी गद्दार म्हटले आम्हाला तलवारी दाखवणारे आज आमच्या पक्षात येऊन मुख्य झाले. येथे आम्ही मुख्य असायला पाहिजे होते तसे झाले नाही ते पैसेवाले आहे म्हणून मुख्य आहे का...? असा प्रश्न सोनवणे यांनी उपस्थित केला. भाजपा मधून आलेल्या उमेदवाराला शिवसेनेचे तिकीट दिले त्यांच्यात जे आहे ते माझ्यात नाही हे शिरसाटांनी सांगावे असाही सवाल सोनवणे यांनी केला.
त्यांनी स्थानिक रननितिवर प्रश्न उपस्थित केले. पाच वर्षे डिपिडीसित सदस्य होतो. पण साहेबांना त्रास होऊ नये म्हणून निधी घेतला नाही एक तिकीट मागितले होते. सगळ्या मोर्चात होतो. भाजपा मधून आलेल्या आयात माणसाला तिकीट दिले म्हणजे त्र्यंबक तुपे यांनी फिक्सिंग केली. भाजपचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी शिंदे गटाकडून एकदम कमकुवत उमेदवार दिला असे कटकारस्थान त्र्यंबक तुपे यांनी भाजपासोबत मिळून केले. असा गंभीर आरोप सोनवणे यांनी केला आहे.
What's Your Reaction?