इफ्तार खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी, फळे, थंड पेय, नवीन डिशेस

इफ्तार खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी, फळे, थंड पेय, नवीन डिशेस
औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) पवित्र रमजान महिना सुरू झाल्याने पहील्या रोजाची इफ्तारी खरेदी करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. फळे, शीतपेय, नवनवीन डिश बाजारात उपलब्ध झाली आहे. केळी, अलिंगड, आंबे, खरबूज, चिकू, सफरचंद, चिकू, अंजिर, पेरु, पंपई, काकडी, भजे, हलिम, फालूदा, शरबत व विविध प्रकारचे खाण्याचे डिश घेण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. यामुळे बाजारपेठ फुलली होती. रोशनगेट, कटकट गेट, शहागंज व शहरातील विविध भागात इफ्तारी खरेदी करण्यासाठी उत्साह दिसून आला. फळांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे पण दर एवढे महाग नाही असे दिसून आले.
What's Your Reaction?






