उद्या ठाकरे गटाचे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, स्तंभ पूजन, खैरेंची उमेदवारी निश्चित...?

 0
उद्या ठाकरे गटाचे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, स्तंभ पूजन, खैरेंची उमेदवारी निश्चित...?

उद्या ठाकरे गटाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, स्तंभ पूजन, महायुतीचा उमेदवार ठरेना

औरंगाबाद नामांतर, मराठा आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीत तापणार...? राजकीय समीकरणे बदलल्यानंतर हि निवडणूक 

औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) उद्या सकाळी दहा वाजता ठाकरे गटाचे समर्थनगर येथे स्तंभ पूजन व प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना महाविकास आघाडी तथा इंडिया आघाडीची उमेदवारी मिळाली असल्याचे मानले जात आहे. महायुतीचा उमेदवार अजून ठरेना. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर सभेत भाजपा लोकसभेची जागा लढेल असे जाहीर केले होते तरी पण आतापर्यंत उमेदवाराची घोषणा झाली नाही. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनीही तयारी सुरू केली. महायुतीच्या प्रचाराच्या अगोदर महाविकास आघाडीचा प्रचार सुरू होणार आहे हे विशेष. चंद्रकांत खैरे यांनी डि-24 न्यूजला सांगितले महायुतीचा उमेदवार कोणीही असो ठाकरे गटाकडून अनेक दिवसांपासून लोकसभेची तयारी सुरू केली आहे. उद्या होणा-या स्तंभ पूजनाची तयारी केली आहे. महाविकास आघाडीतील नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. चार वेळा चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा गड राखला होता. मागच्या निवडणुकीत मतांचे विभाजनाचा फायदा एमआयएमला झाला व वंचितची साथ मिळाल्याने इम्तियाज जलील यांचा थोड्या मताने विजय झाला होता. यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार असल्याने कोणाचे पारडे जड येणारा काळ ठरवेल. महायुतीच्या वतीने शिंदे गटाने या जागेवर दावा केला आहे. पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे नाव चर्चेत आहे. महायुतीची उमेदवारी डॉ भागवत कराड किंवा संदीपान भुमरे अथवा नवीन चेहरा दिला जातो हे काही दिवसांत कळेलच. ठाकरे गटाची ताकत बंडखोरीमुळे कमी झाली यामुळे भाजपाचा येथे विजय होऊ शकते असा दावा भाजपाचे नेते करत आहे. पण या जागेवर महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. वंचितने आतापर्यंत आपले पत्ते उघडले नाही.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow