वैजापूरचे मा.नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बांधले शिवबंधन, भाजपाला धक्का

 0
वैजापूरचे मा.नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बांधले शिवबंधन, भाजपाला धक्का

वैजापूरचे मा.नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बांधले शिवबंधन, भाजपाला धक्का

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) वैजापूर येथील भाजपाचे माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी व काही नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी कन्नड आणि वैजापूर येथील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रवेशाने भाजपाला धक्का मानला जात आहे.

डॉ.दिनेश परदेशी यांच्यासह नगरसेवक शेख रियाज, शैलेश चव्हाण, गणेश खैरे व नगरसेवक, बाजार समिती संचालक, सरपंच व उपसरपंच व भाजपा व विविध पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. प्रवेश सोहळ्यानंतर विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले डॉ.दिनेश परदेशी व त्यांच्या पत्नी सातत्याने नगराध्यक्ष पदावर निवडून येत आहे. त्यांनी विधानसभा निवडणुक सुध्दा लढली आहे. दिवंगत मा.आमदार आर एम वाणी आज हयात असते तर गद्दारांना उलटं टांगून मारलं असतं. आता परदेशी यांची घरवापसी झाली आहे गद्दारांना विधानसभा निवडणुकीत गाडायचे आहे असे दानवे यावेळी म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow