मराठवाड्याचे प्रश्न पोटतिडकीने मांडणा-या सतीश चव्हाण यांना विजयी करा - सुनील तटकरे

 0
मराठवाड्याचे प्रश्न पोटतिडकीने मांडणा-या सतीश चव्हाण यांना विजयी करा - सुनील तटकरे

मराठवाड्याचे प्रश्न पोटतिडकीने मांडणाऱ्या आमदार सतीश चव्हाण यांना विजयी करा

खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत लातूर येथे महायुतीचा मेळावा संपन्न

लातूर, दि.15(डि-24 न्यूज)- मागील तीन 'टर्म' पासून आमदार सतीश चव्हाण मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सभागृहात वेळोवेळी आवाज उठवला. त्यामुळे मराठवाड्याच्या प्रश्नांची उत्तम जाण असणाऱ्या व मराठवाड्याचे प्रश्न सभागृहात पोटतिडकीने मांडणाऱ्या आमदार सतीश चव्हाण यांना प्रथम पसंतीचे मत देऊन मोठ्या मताधिक्याने विजय करावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी केले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज (15 ऑक्टोबर) खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. 

याप्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या कार्याचा अहवाल सादर करत आपला उमेदवार हा पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम आहे.विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकून कौशल्यावर आधारित रोजगार निर्मितीसाठी तळमळीने विधानसभेत प्रश्न मांडणारा असून आजपर्यंत जलसिंचन,निट परीक्षा, शैक्षणिक,आरक्षण, शिष्यवृत्ती, आरोग्याच्या प्रश्नावर तुटून पडणार आहे. त्यामुळे पदवीधर मतदारांनी पहिल्या पसंतीचे मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले.

 माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपा पदवीधर आ.सतीश चव्हाण यांच्या मागे खंबीरपणे उभी आहे.मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे माजी स्व.वसंतराव काळे यांच्या पावलावर पाऊल ठेवून सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे कसब सतीश चव्हाण यांच्याकडे असून लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर सर्व भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल.असा विश्वास व्यक्त केला.

माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे, मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे, औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अफसरबाबा शेख, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, शिवसेना जिल्हाध्यक्ष सचिन दाणे, प्रदेश सरचिटणीस व्यंकटराव बेद्रे, सभापती सुरजभैय्या पाटील, माजी महापौर तथा नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, उपाध्यक्ष दयानंदराव सुरवसे, बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिराजदार, समाजकल्याण सभापती उत्तमराव माने, अरविंद पाटील निलंगेकर, प्रदेश सरचिटणीस बबनराव भोसले, माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, नगरसेवक ऋषीराजे, लाला सुरवसे, ॲड. किरण सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अंकुशराव नाडे, प्रदेश सरचिटणीस मूर्तुजा खान, इब्राहिम सय्यद, प्रदेश सरचिटणीस सुरेखाताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रणिताताई सूर्यवंशी, प्रदेश सरचिटणीस शिवानंद तात्या हेंगणे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुलेमान शेख,बक्तावर बागवान, परमेश्वर पवार,यांच्यासह आर. आर. चव्हाण,अब्दुल गालिब शेख आणि महायुतीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व लातूर जिल्ह्यातील पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow