महाविकास आघाडीचे युवा आणि भाजपात राडा, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
महाविकास आघाडीचे युवा आणि भाजपात राडा, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी तर भाजपाने केले राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन, पोलिसांनी मध्यस्थी केल्याने तणाव निवळला तर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात...
औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) काल मुंबईत उध्दव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील युवासेना, युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी अक्रामक आंदोलन सुरू केले यावेळी भाजयुमो व भाजपाच्या कार्यकर्त्यांना खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान यांच्या ओबीसीबाबत वक्तव्याचा निषेध आंदोलन सुरू केले. यावेळी दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरू करत कार्यकर्ते समोरासमोर आले व राडा सुरु झाला.
यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीतील कार्यकर्ते जास्तच अक्रामक झाले. आम्हाला शांत करण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहे मग सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांना का रोखले जात नाही. पाच मिनिटांत आम्हाला ताब्यात घेतले तर त्यांना का नाही असा इशारा युवती काँग्रेसच्या प्रवक्ते दिक्षा पवार यांनी देत जोपर्यंत भाजपाच्या महीला कार्यकर्त्यांना अटक करत नाही तोपर्यंत पोलिस ठाण्यातून हलणार नाही असा पवित्रा घेतला.
दोन्ही गट आमनेसामने आल्याने काही काळ क्रांतीचौकात तणावाचे वातावरण होते. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वातावरण निवळले.
भाजपाच्या वतीने राहुल गांधीचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांच्या पोस्टरवर जोडे मारो आंदोलन करत पंतप्रधान यांचा अपमान करणारे वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्याचा आरोप केला. तर राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याने गुंडांवर कायद्याचा धाक उरलेला नाही म्हणून घोसाळकर यांची हत्या झाली असल्याचा आरोप यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख हनुमान शिंदे यांनी करत गृहमंत्री फडणवीस यांना नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
याप्रसंगी महाविकास आघाडीतील धर्मराज दानवे, विश्वास औताडे, वरुन पाथ्रीकर, प्रशांत जगताप, सुशील बोर्डे, सागर खडसे, दिक्षा पवार, धनश्री तरवळकर, दिपाली पाटील, अनिता देवतराज, अतुल बीडकर, अमर जगताप व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
भाजपाच्या निषेध आंदोलनात माजी नगरसेवक राजगौरव वानखेडे, ओबीसी मोर्चाचे ज्ञानेश्वर बोरसे, रामेश्वर भादवे, मनिषा मुंडे, सचिन करोडे, कचरु घोडके व कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
What's Your Reaction?