एमआयडीसी व नगरपरिषद हद्दवाढ रद्द करण्यासाठी सिल्लोड शहरात अनोखा मोर्चा

 0
एमआयडीसी व नगरपरिषद हद्दवाढ रद्द करण्यासाठी सिल्लोड शहरात अनोखा मोर्चा

एमआयडीसी व नगरपरिषद हद्दवाढ रद्द करण्यासाठी सिल्लोड शहरात मोर्चा

सिल्लोड, दि.8(डि-24 न्यूज) तालूक्यात प्रस्तावित एमआयडीसी व सिल्लोड नगरपरिषदेची हद्दवाढ रद्द करावी या मागणीसाठी तालुक्यातील नागरीकांनी रस्त्यावर उतरुन आगळा वेगळा मोर्चा काढला.

या आंदोलनात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन उत्सूफूर्त प्रतिसाद मिळाला.

डोंगरगाव, मंगरुळ, रजाळवाडी व मोढा या चार गावातील एम आय डी सीतील आरक्षण तात्काळ रद्द करुन सातबारा आरक्षण मुक्त करावे. नगरपरिषद सिल्लोडची हद्दवाढ डोंगरगाव, मंगरुळ, रजाळवाडी, मोढा बुद्रुक, माणिकनगर(भवन), पिंपरी व वरुड या आठ गावातील हद्दवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी. गायरान जमिनीत विविध योजनेच्या नावांवर हस्तांतरण करुन गोरगरीब शेतकऱ्यांना भुमिहीन करु नये. लिहा खेडी येथील लिहा शिवारातील गट क्रं.452, 453, 455 मधील शासकीय गायरान जमीन हस्तांतरण करु नये या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. या अनोख्या मोर्चात फटाके व बँड बाजासह काही तक्रारदार रथामध्ये बसून सहभागी झाले. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हा मोर्चा आंबेडकर चौकातून महावीर चौक, सराफा मार्केट, पोलिस स्टेशन मार्गे शासकीय विश्रामगृहाजवळ विसर्जित करण्यात आ

ला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow