अनेक मुस्लिम दिग्गज माझ्या संपर्कात, डॉ.शोएब हाश्मी यांचा दावा...!
अनेक मुस्लिम दिग्गज माझ्या संपर्कात, डॉ.शोएब हाश्मी यांचा दावा
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रसार माध्यमांशी साधला संवाद, म्हणाले आमदार, खासदार पदासाठी नाही तर समाजाच्या भल्यासाठी केला प्रवेश...! महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत यश मिळेल अशी अपेक्षा केली व्यक्त...
औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) उध्दव ठाकरे यांच्याशी त्यांनी केलेल्या कोविड काळातील कामामुळे व मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात एनआरसी लागू करणार नाही अशी कणखर भूमिका घेतल्यामुळे प्रभावित होऊन व राज्याच्या विकासासाठी असलेले व्हिजन बघता त्यांच्यासोबत काम करण्याची मनातून इच्छा झाली म्हणून समाजाच्या भल्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला अशी माहिती डॉ. शोएब हाश्मी पहील्याच पत्रकार परिषदेत हि माहिती दिली.
त्यांच्या प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकारणात परिवर्तन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डॉ.हाश्मी यांनी पुढे सांगितले शहरातील काही मुस्लिम चेहरे शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. विविध पक्षातील काही माजी नगरसेवक व राजकीय पार्श्वभूमी असलेले दहा नेते संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी पत्रकार परिषदेत केला. लवकरच एका कार्यक्रमात त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी यावेळी हेही स्पष्ट केले माझे सर्व राजकीय व सामाजिक संघटनेचे नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. विविध पक्षातून पक्ष प्रवेश करण्याची ऑफर पण मिळाली होती. पण मी ती ऑफर नम्रपणे नाकारुन शिवसेनेत प्रवेश केला आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत एका पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक होतो हे खरे आहे पण या पक्षात सर्वांना सोबत घेऊन भविष्यात समाजासाठी काही चांगले करण्याची इच्छा आहे. आमदार, खासदार बणण्यासाठी या पक्षात आलो नाही तर राज्यस्तरावर काम करत समाजाचे राजकारणातून कसे फलित होईल अशी अपेक्षा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत समाज उभा राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली. आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाने जी जवाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पूर्ण करु असे शेवटी त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?