विविध पक्षांच्या नेत्यांच्या इम्तियाज जलील यांच्यासोबत भेटीगाठी वाढल्या...!
विविध पक्षांच्या नेत्यांचा इम्तियाज जलील यांना भेटण्यासाठी वाढला वावर...! राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
एमआयएमशी आघाडीबाबत चर्चा सुरू झाली, आज राजु शेट्टी यांनीही त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन राजकीय चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे... काही समविचारी पक्षांसोबत युती केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात दोन आमदारांची संख्या आहे ती वाढावी यासाठी एमआयएम प्रयत्नशील असल्याचे या भेटीवरून दिसत आहे...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.30(डि-24 न्यूज) जशाजशा विधानसभा निवडणुक जवळ येत आहे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी येऊन विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढत आहे. अगोदर नवनियुक्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांची भेट घेतली त्यानंतर आताच शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेले पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. बंद दाराआड या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असेल हा प्रश्न एमआयएमच्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होत आहे. अब्दुल सत्तार हे शिंदे गटाचे आमदार आणि दुर्राणी हे शरद पवार गटाचे नेते आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सुध्दा आज त्यांची भेट घेऊन चर्चा केली. सर्व
पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी रणनिती बनवायला सुरुवात केली आहे. शहरात एमआयएमची ताकत आहे यामुळे तर नाही ना या भेटीगाठी वाढल्या असाही प्रश्न उपस्थित होत आहे. इम्तियाज जलील हे विधानसभा निवडणुकीत उतरणार आहे त्यासाठी त्यांनी तयारी सुध्दा सुरू केली आहे. सर्व पक्षांच्या नजरा ह्या औरंगाबाद पूर्व व औरंगाबाद मध्य विधानसभा जागेवर लागले आहे या दोन मतदारसंघात मुस्लिम मतांची टक्केवारी निर्णायक असल्याने महत्त्व वाढले आहे. इम्तियाज जलील कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार हे पक्षाने जाहीर केले नसले तरी राजकीय नेत्यांच्या फिल्डिंग आतापासूनच लागल्या की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे. इम्तियाज जलील यांना भेटीगाठी बाबत विचारले असता त्यांनी सांगितले सर्व राजकीय पक्षांच्या विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी मित्रता असते. अब्दुल सत्तार हे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत विकासाच्या दृष्टीने भेट घेतली तर त्यात वाईट काय. सर्व पक्षांचे नेते मला भेटायला येतात यात काही शंका नसायला नको असे उत्तर त्यांनी दिले.
What's Your Reaction?