मनसेने सुरू केली निवडणुकीची तयारी, आज झालेल्या बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.30(डि-24 न्यूज)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनसेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुंबई येथे तीन दिवसापूर्वी झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी 225 ते 250 जागा लढण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पक्षाचे निरीक्षक यांनी पहिल्या टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करून आपला अहवाल त्यांना सोपवला.
पक्षाच्या दुसऱ्या टप्प्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या निरीक्षकांनी विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांशी संवाद दौरा सुरू केलेला आहे. त्यानुसार आज सुभेदारी विश्रामगृह येथे पक्षाचे निरीक्षक श्री संजय नाईक यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्य,पूर्व आणि पश्चिम मतदार संघातील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानुसार पक्ष तीनही विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीची तयारी करत आहे. पक्षाकडे पक्षातीलच अनेक इच्छुकांनी देखील लढण्याची इच्छा पक्ष निरीक्षक यांच्याकडे व्यक्त केलेली आहे. आज इतर पक्षातील तीन जणांनी देखील पक्ष निरीक्षकांची वैयक्तिक भेट घेतली आहे.
पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने करण्याची कामे यावेळी श्री संजय नाईक यांनी पदाधिकाऱ्यांना समजून सांगितले. पदाधिकाऱ्यांनी देखील लोकसभा निवडणुकीत आलेले अनुभव यावेळी बैठकीत मांडलेत. गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या कामांचा आढावा देखील बैठकीत घेण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, महानगराध्यक्ष बिपिन नाईक, शहराध्यक्ष गजनगौडा पाटील, आशिष सुरडकर, जिल्हा सचिव अनिकेत निलावार, प्रशांत जोशी यांच्या समवेत अशोक पवार, अभय देशपांडे, सौ लीला राजपूत, राजू जावळीकर, विनोद भाले, नारायण खरात यांच्या सहित पक्षाचे उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
होती.
What's Your Reaction?