राहुल गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसचा रास्ता रोको, निदर्शने

 0
राहुल गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसचा रास्ता रोको, निदर्शने

विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रास्ता रोको व जोरदार निदर्शने....

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) -

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खा.श्री. राहुल गांधी यांनी दिल्लीत मत चोरीच्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदार यादी मध्ये झालेला गैरप्रकार जनतेच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. या गैरप्रकारामुळे निवडणूक प्रभावी होऊन भाजपाला सत्ता मिळालेली आहे.

आज संसद परिसरात विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी व इंडिया आघाडीतील व राज्यसभा व लोकसभेतील सहकारी खासदारांना अटक करण्यात आली. ह्या अटकेच्या निषेधार्थ आज शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने व रास्ता रोको करण्यात आले. 

वोट चोर, गद्दी छोड, संविधान व लोकशाहीचा विजय असो, निवडणूक आयोग जवाब दो, भाजपा सरकार मुर्दाबाद अशा मोठ्या प्रमाणावर घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला होता. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ म्हणाले की मतचोरी ने बनलेल्या या सरकार ला राष्ट्रपतींनी बरखास्त करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आज पक्ष कार्यालय, गांधी भवन येथे खा. राहुल गांधी यांची पत्रकार परिषद स्क्रीनवर प्रसारित करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहरजिल्हा अध्यक्ष शेख युसूफ, जगन्नाथ काळे, भाऊसाहेब जगताप, सूर्यकांत गरड, विनोद तांबे, इक्बालसिंग गिल, जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अनीस पटेल, अतिश पितळे, उमाकांत खोतकर, शेख कैसर बाबा, राहुल सावंत, डॉ. निलेश आंबेवाडीकर, संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, शेख अथर, अमेर अब्दुल सलीम, साहेबराव बनकर, सोहेल मस्रूर खान, बाबुराव कवसकर, मोईन इनामदार, शेख रईस, इंजि. मोहसिन खान, इंजि. इफ्तेकार शेख, मोहसिन खान, अखिल पटेल, जावेद पठाण, मतीन अहमद, सलीम खान, शेख फय्याजोद्दीन, शेख रईस, शेख युनुस, संतोष मेटे, दिलीप भोसले, नईम मंसूरी, सोमनाथ पळसकर, पंढरीनाथ जाधव, संतोष शेजुळ, अरुण शिरसाट, मुझफ्फर खान, सय्यद फराज अबेदि, सय्यद फय्याजोद्दीन, प्रमोद सदाशिवे, शेख फैज, सलीम इनामदार, अस्मत खान, लतिफ पटेल, रफिक खान, अकाश रगडे, अमीन खान, आबेद जहागिरदार, निमेश पटेल, मोईन कुरैशी, पप्पूराज ठुबे, प्रकाश सानप, सय्यद युनुस, जाफर खान, माजेद शेख, बबन डीडोरे, किशोर चावरिया, साजिद कुरैशी, अनिता भंडारी, अनिता घोरपडे, शीला मगरे, विद्या ताई घोरपडे, आदित्य गवळी, विशाल वानखेडे, नदीम सौदागर, अनिता भंडारी, अनिता घोरपडे, शीला मगरे, विद्याताई घोरपडे, उषा खंडागळे, शकुंतला साबळे, साबियाबाजी शेख, आदित्य गवळी, विशाल वानखेडे, मोहम्मद इहतेशाम, मुद्दसिर अन्सारी, यांच्यासह मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow