शांतीगिरी महाराज उतरणार राजकीय आखाड्यात, नाशिक मधून लोकसभेच्या मैदानात

 0
शांतीगिरी महाराज उतरणार राजकीय आखाड्यात, नाशिक मधून लोकसभेच्या मैदानात

शांतीगिरी महाराज नाशिक मधून निवडणूक लढणार, तर 7 मतदारसंघातून उमेदवार देणार...?

या मतदारसंघात जय बाबाजी भक्त परिवाराचे लाखो लोक अनुयायी आहेत...आज शहरातील संत एकनाथ रंगमंदिरात प्रमुख प्रचारकांची बैठक घेत त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.... त्यांच्या राजकीय आखाड्यात उतरण्याच्या या निर्णयामुळे राजकीय गणिते बिघडणार असल्याचे बोलले जात आहे..... औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत 2009 मध्ये शांतीगिरी महाराज यांनी दिड लाख मते घेतली होती. 2014 व 2019 निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता....

औरंगाबाद, दि.25(डि-24 न्यूज) आगामी 2024 लोकसभा निवडणुकीत महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज हे नाशिक लोकसभा निवडणुकीच्या मैदानात अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहे. औरंगाबाद, जालना, दिंडोरी, जळगाव, अहमदनगर, धुळे, शिर्डी या लोकसभा निवडणुकीत जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने साधुसंतांना उमेदवारी देणार अथवा लढा राष्ट्र हिताचा संकल्प शुध्द राजकारणाचा टॅग लाईन या निवडणुकीत असणार आहे. हिंदूत्वावादी विचारधारेला धरुन हि निवडणूक लढणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात न बोलता राष्ट्रहितासाठी निवडणूक लढणार आहे. आमचा कोणी शत्रु नाही. निस्वार्थ, चारित्र्यवान कर्तव्यदक्ष उमेदवार दिले जातील अशी माहिती पत्रकार परिषदेत महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांनी दिली आहे. यावेळी राजकीय समितीचे प्रमुख राजेंद्र पवार व असंख्य भक्तगण उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow