दिवसभर इंटरनेट सेवा बंद झाल्याने कोट्यावधींचा फटका...? अंबडमध्ये कर्फ्यु...

 0
दिवसभर इंटरनेट सेवा बंद झाल्याने कोट्यावधींचा फटका...? अंबडमध्ये कर्फ्यु...

इंटरनेट सेवा बंद सर्वच व्यवसायावर परिणाम, अंदाजे कोट्यावधीचा फटका, अंबड मध्ये कर्फ्यु ...मनोज जरांगे यांना औरंगाबाद शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले... दिवसभर ग्राहकांना इंटरनेट सेवा देणा-या कंपन्यांचे फोन खनखनत होते...

औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) जालना जिल्ह्यामध्ये आंदोलकांनी बस पेटवल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने औरंगाबाद सह तीन जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना केल्या सोशल मीडियावर अफवा पसरु नये म्हणून सरकारने सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्याचे मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत आदेश दिले होते. अंबड मध्ये कर्फ्यु आहे. सकाळपासून इंटरनेट सेवा बंद असल्याने सर्वच व्यवसायावर याचा परिणाम दिसून आला. एसटी बससेवा सुध्दा तीन जिल्ह्यांत बंद करण्यात आली. दिवसभर इंटरनेट बंद असल्याने बँकिंग सेवेवर याचा जास्त परिणाम झाला. फोन पे व ऑनलाईन व्यवहार दिवसभर ठप्प झाले होते. पाच वाजता इंटरनेट सेवा पूर्ववत झाल्याने दिलासा मिळाला. जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथे अज्ञात आंदोलकांनी एसटी बस पेटवून दिली त्यानंतर हे लोन आणखी पसरू नये म्हणून अंबड तालुक्यात जिल्हा प्रशासनाने कर्फ्यू लागू केला याशिवाय बीड जालना आणि औरंगाबाद शहरांमध्ये बस सेवा बंद करण्यात आली इतरत्र पोहोचू नये यासाठी प्रशासन व राज्य शासनाने पूर्णता खबरदारी घेतली सोशल मीडिया व्हाट्सअप फवा पसरू नये म्हणून शासनाने अचानक औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश दिले. इंटरनेट बंद झाल्याने मोबाईल व संगणकावर काम करने बंद झाल्याने ग्राहक भयभीत झाले होते. शासकीय व खाजगी कार्यालयातील कामे खोळंबली होती.

राज्यात मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे. जालना जिल्ह्यात काल एक एसटी बस पेटवल्याने राज्यात याचा परिणाम होऊ नये म्हणून गृह विभागाने उपाययोजना करत कायदा व सुव्यवस्था बिघडू नये. शांतता राहावी यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मनोज जरांगेंना औरंगाबाद शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow