मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईकडे जाणार, वाहतूकीत बदल...

मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईकडे जाणार, वाहतूकीत बदल...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) -
दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची वाहन रॅली मुंबई कडे जाणार असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. चारचाकी व दुचाकी वाहनांच्या ताफ्यासह आंतरवाली सराटी येथून शहागड-तुळजापुर-पैठण-शेवगाव मार्गे मुंबई येथे जाणार आहेत. तसेच त्यांचे वाहन ताफ्यात नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव(उस्मानाबाद), बीड, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोक चारचाकी, दुचाकी वाहने घेऊन रॅली मध्ये सहभाग घेणार आहे. त्यामुळे सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी होण्याची व अपघात होऊन जिवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 27 ते 28 ऑगस्ट या कालावधीत वाहतूकीची कोंडी निर्माण होऊन अथवा एखादा अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरीता 27 ऑगस्ट रात्री 12 वाजून 1 मिनट ते 28 ऑगस्ट रोजीचे सकाळी 6 वाजे पावेतो वरील मार्गाने जाणारी सर्व जड वाहतूक खालील मार्गाने वळविण्यात येत आहे. पुर्वीचा जड वाहतूक मार्ग छत्रपती संभाजीनगर-बिडकीन-पैठण-मार्गे शेवगाव कडे जाणारी वाहने बदल करण्यात आलेल्या जड वाहतूक मार्ग छत्रपती संभाजीनगर-वाळूज-गंगापुर-नेवासा मार्गे शेगावकडे जातील. शेवगाव-पैठण-बिडकीन-मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे येणारी वाहने शेवगाव-नेवासा-गंगापुर-वाळुज-मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे येतील. शहागड-हिरडपुरी-तुळजापुर-नवगाव-मार्गे पैठण कडे येणारी वाहने शहागड-डोणगाव-पाचोड-मार्गे पैठण कडे येतील. पैठण-नवगाव-तुळजापुर-हिरडपुरी-मार्गे शहागडकडे जाणारी वाहने पैठण-पाचोड-डोणगाव मार्गे शहागडकडे जातील. वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी वाहनधारकांनी नियमांचे पालन करत पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलिस अधिक्षक डाॅ.विनयकुमार राठोड यांनी केले आहे.
What's Your Reaction?






