स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निर्णय स्थानिक पातळीवर - प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर - प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
कार्यकर्त्यांमध्ये संचारला 'अच्छे दिन'चा फिल, काँग्रेसला नेते नव्हे मुदस्सर अन्सारी सारख्या कार्यकर्त्यांची गरज, ना पदाची ना तिकीटाची लालसा तरीही प्रत्येक कार्यक्रमात हजर, जे ब्लाॅक अध्यक्ष बैठकीला आले नाही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे जिल्हाध्यक्षांना आदेश...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) - काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा पक्ष आहे नेत्यांच्या नाही. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष राज्यात एक नंबरचा पक्ष म्हणून उदयास येईल. राजकीय वातावरण बघता काँग्रेसला संधी चालून आली आहे कार्यकर्त्यांनी संधीचे सोने करावे. कच्चे दिन येत आहे म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य पातळीवर कुठल्याही प्रकारची आघाडी केली जाणार नाही. आघाडीचे अधिकार हे स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी शहर, तालुका, जिल्हा पातळीवर चर्चा करावी. स्थानिक पातळीवर एकमत होत असेल, तर आघाडी करावी., असे धोरण ठरविले आहे, आमच्या मित्र पक्षांना देखील आम्ही स्थानिक पातळीवर अधिकार देत असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रदेशाध्यक्षांच्या घोषणेने स्थानिक कार्यकर्त्यांनाही आता 'अच्छे दिन' येण्याचा विश्वास जागृत झाल्याची चर्चा रंगली आहे.
आगामी काळात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी काँग्रेस नेत्यांनी मराठवाड्यातील विभागीय बैठक शहरातील शिवनेरी लॉन्स येथे घेतली. बैठकीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, विश्वजीत कदम, मधुकर चव्हाण, खा. डॉ. कल्याण काळे, राष्ट्रीय सचिव कुणाल चौधरी, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष शेख युसूफ, माजी आमदार नामदेवराव पवार, एम. एम. शेख, प्रदेश सचिव डॉ. जफर अहेमद खान, डॉ. जितेंद्र देहाडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली आढावा बैठक आज झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्ता मजबूत करण्याकडे आम्ही वाटचाल करत आहोत. भाजपसारखा लोकशाहीच्या विरोधातील एक राक्षस हा संविधान बदलायला निघाला, तेव्हा आघाडी कराव्या या लागतात. जेव्हा आघाडी, युती या गोष्टी कराव्या लागतात, तेव्हा कुठे ना कुठे पक्षालादेखील किंमत चुकवावी लागते., असेही ते म्हणाले. यावेळी लाडकी बहिण, सरकारची फसवी आश्वासने, मत चोरी आदी विविध विषयांवर भाष्य केले. लाडकी बहिण योजनेत महायुती सरकारने महिलांची, शेतक-यांची फसवणुक केली आहे, 3 हजार रुपये देवू असे सांगून 1500 रुपये देत आहे. लाभ देताना बोगस अर्ज मंजूर करण्यात आले. अशा लाभार्थ्यांना वाटप झालेली रक्कम ही संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करावी, त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणीही यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशीच काँग्रेस पक्षाची भूमिका राहिलेली आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंघाने जातीनिहाय जनगणना ताबडतोब करावी, आणि जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंघाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मंदीमध्ये असते संधी
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा कानमंत्र... मतांच्या चोरीचा मुद्दा आगामी निवडणुकीत गाजणार...
कॉंग्रेससाठी अडचणीचा काळ असला तरी आमचे विचार मजबूत आहेत आणि याच विचारांच्या बळावर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. मंदीमध्ये संधी असते, हे नेहमी लक्षात ठेवा, असा कानमंत्र काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी कार्यकर्त्यांना दिला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक सोमवारी पार पडली. यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवणे, निवडणूक आयोगाचा गैरवापर करणे आणि मतांची चोरी करणे, हाच भाजपचा पॅटर्न आहे. पण जनता आता त्यांच्या या डावांना बळी पडणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत जनता भाजपला धडा शिकवेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतांच्या चोरीचा मुद्दा नक्कीच गाजणार आहे. यावर काँग्रेसचे पूर्ण लक्ष असणार आहे. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवरही टिका केली.
किर्तनकार संग्रामबापू भंडारे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, वारकरी संप्रदायातील आम्ही देखील आहोत. गगनगिरी महाराजांच्या सप्ताहमध्ये वाढण्यापासूनचे काम आपण केले आहे. गावोगावी मंदिरांचे बांधकाम व सुशोभीकरण आपण केले. पण कधीही धर्माचा देखावा केला नाही. तो तथाकथित महाराज नारदाच्या गादीचा अपमान करत आहे. त्याला राजकारण करायचे तर त्याने राजकीय स्टेजवर भाषण करावे.
आगामी निवडणुकीत महायुती सरकारच्या कारस्थानाचा पर्दाफाश करण्याचा निश्चय, तसेच या सरकारला धडा शिकवला पाहिजे, ही भूमिका काँग्रेसच्या या व्यासपीठावरून व्यक्त करण्यात आल्याचे माजी मंत्री अमित देशमुख सांगितले. महायुती सरकारने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आश्वासने दिली, त्या आश्वासनांची पूर्ती अजूनही होताना दिसत नाही. मराठवाडा वॉटर ग्रीड, मराठवाड्यातील नव्याने प्रकल्प, शेतकरी आत्महत्या, शेतीमालला हमीभाव नाही, केंद्र व राज्य शासनाचे धोरण हे शेतकरी विरोधी आहे, म्हणून मराठवाड्यातील मागासलेपण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. देशात, व राज्यात लोकशाहीची विटंबना करणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना वेळीच धडा शिकवावा लागेल, भारताच्या गौरवशाली लोकशाही परंपरेचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. कार्यकर्त्यांनी खचून जावू नये. काँग्रेस नेते न थांबता काम करत आहे. त्यांच्याकडून देशाच्या जनतेच्या अपेक्षा वाढले आहे. बिहारमध्ये मतांच्या अधिकार यात्रेला प्रतिसाद मिळत आहे. असे ते म्हणाले.
What's Your Reaction?






