दोनशे कोटी पाण्यात तरीही अरबी समुद्रात शिवस्मारकाचे काम बंद...!

 0
दोनशे कोटी पाण्यात तरीही अरबी समुद्रात शिवस्मारकाचे काम बंद...!

अरबी समुद्रात बनत असलेल्या स्मारकाचे दोनशे कोटी पाण्यात तरीही काम अद्यापपर्यंत सुरू झाले नाही...!

मराठा समाज पंतप्रधानांनी केलेल्या जलपुजनाचे वर्धापनदिन आनंदोत्सव साजरा करुन आठवण करून देणार, पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक तयार झाले मग शिवरायांचे का नाही मराठा समाजाचा सरकारला सवाल...

छत्रपती संभाजीनगर(डि-24 न्यूज),दि.13(डि-24 न्यूज) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकारण करायचे आणि अरबी समुद्रात भव्य शिवस्मारकाचे काम सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 डिसेंबर 2016 रोजी जलपुजन केले होते. आठ वर्षे उलटली तरीही शिवरायांच्या स्मारकाचे काम सुरू झाले नाही. आतापर्यंत काम सुरू होणार यासाठी दोनशे कोटी रुपये खर्च झाले. सर्वोच्च न्यायालयाची तोंडी स्थगिती आहे लेखी नाही तरीही आतापर्यंत सरकार न्यायालयातही रुजू झाले नाही. स्मारकाचे काम सुरू झाले नाही याची खंत आहे सरकारला आठवण करुन देण्यासाठी 24 डिसेंबर 2024 रोजी अरबी समुद्रात आनंदोत्सव साजरा करुन जलपुजनाचे वर्धापनदिन मोठ्या उत्साहात शिवभक्त साजरे करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सकल शिवप्रेमी शिवस्मारक समितीच्या वतीने प्रा.चंद्रकांत भराट यांनी दिली आहे.

यावेळी सुरेश वाकडे, सतीश वेताळ, सुकन्या भोसले, आत्माराम शिंदे, रेखा वहाटुळे, विठ्ठल पाटील, सुमित दिक्षित उपस्थित होते.

सकल मराठा समाजाचे भराट यांनी पुढे सांगितले पंतप्रधानांनी मोठ्या उत्साहात अरबी समुद्रात शिवस्मारकाचे काम सुरू करण्यासाठी भुमिपूजन व जलपूजन केले होते. 30 वर्षांपासून हि मागणी असताना फक्त राजकारण करुन निवडणूका जिंकल्या परंतु शिवस्मारक व्हावे यासाठी गंभीरता दाखवली गेली नाही. सन 2013 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले आणि लगेच काम सुरू करुन 42 महिन्यात बांधून पूर्ण केले 31 ऑगस्टला लोकार्पण केले परंतु 1994 साली सर्वात प्रथम छावा मराठा युवा संघटनेने अरबी समुद्रात स्टॅच्यू ऑफ लिबर्टिच्या धर्तीवर नव्हे त्याही पेक्षा मोठे शिवस्मारक निर्माण करावे म्हणून शासनाकडे पाठपुरावा केला होता तेव्हापासून प्रत्येक सरकारने फक्त राजकारण केले. सन 14 जून 1996 पासूनची हि जुनी मागणी आहे त्यापासून 2024 पर्यंत काय घटनाक्रम घडला याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 2018 ला शिवस्मारकाचे काम प्रत्यक्ष सुरू न होताच खर्च किंमत मात्र 700 कोटीवरुन 2500 कोटी नंतर 3000 कोटी पर्यंत गेली परंतु काम सुरू झाले नाही. 2018 ला एल एण्ड टी कंपनीला शिवस्मारक उभारण्याची निविदा देवून वर्क ऑर्डर दिली. परंतु काम सुरू झाले नाही. 13 जानेवारी 2019 ला पर्यावरणवाद्यांनी न्यायालयात केस केली त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली ती आजपर्यंत कायम आहे. नियोजित शिवस्मारक अरबी समुद्रात राज्यपाल भवनपासून 1.5 कि.मी. गिरगाव चौपाटी पासून 3.5 कि.मी. नरिमन पॉइंट पासून 5.5 कि.मी.समुद्रात 7.1 हेक्टर जागेवर महाराजांचे जगातील सर्वात उंच स्मारक होणार आहे. 2018 मध्ये एल एण्ड टी कंपनीने समुद्रातील जागेचे सर्वेक्षण करुन त्याकरीता लागणारे 50 भूस्तर बोअर घेतले व परिक्षण केले. तरीही स्मारकाचे काम सुरू झाले नाही परंतु कोर्ट कचेरी, सल्लागार, आर्किटेक्ट यासाठी आजपर्यंत सुरुवातीला 35 कोटी खर्च झाले त्यानंतर 200 कोटी खर्च झाले काम काहीच झाले नाही अशी परिस्थिती आहे. शिवस्मारकाचे काम अद्याप बंद आहे. सरकारला याची थोडी लाज वाटावी म्हणून महाराष्ट्र व देशातील सर्व जातीय , धर्मिय, शिवप्रेमी, शिवभक्त, सकल मराठा समाज, छावा मराठा युवा संघटना व समविचारी संघटना येत्या 24 डिसेंबरला सकाळी 11 वाजता गिरगाव चौपाटी, मुंबईत समुद्र किनारी पुन्हा एकदा "जलपूजनाचा" आठवा वर्धापनदिन हर्ष उल्हासात, आनंदाने शिवस्मारकाचे काम सुरू न झाल्याने आनंद व्यक्त करणार आहे. या कार्यक्रमानंतर प्रतिकात्मक शिवस्मारक रथ मुंबई वरून संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी शिवस्मारक बांधकाम निधी सरकारला मदत देण्यासाठी जाणार आहे तरी शासनाने 19 फेब्रुवारी 2025 पर्यंत शिवस्मारकाचे काम सुरू करावे अन्यथा ते काम महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात द्यावे ते स्मारक आम्ही पूर्ण करु असा इशारा दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow