मराठा समाजासारखी मुस्लिम समाजाने आपली ताकत दाखवावी - हिशाम उस्मानी
मराठा समाजासारखी मुस्लिम समाजाने आपली ताकत दाखवावी - हिशाम उस्मानी
औरंगाबादचे नाव परत ठेवण्यासाठी निर्णय घेणार शरद पवारांनी जाहिरनाम्यात वचन द्यावे...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.3(प्रतिनिधी) विधानसभा निवडणुक जसजशी जवळ येत आहे राजकीय पक्ष मतांसाठी आश्वासने देत आहे. अहमदनगरचे नाव अहिल्याबाई होळकर नामांतर करु नये यासाठी प्रयत्न करावे या मागणीसाठी तेथील नागरिकांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या आमदारांना निवडून द्या सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. त्याचप्रमाणे ऐतिहासिक औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला गेला या शहराचे नाव परत औरंगाबाद करण्याचा निर्णय घेवू असे आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात लेखी आश्वासन द्यावे. या शहरात दोन महानगरपालिका अस्तित्वात येईल अशी आजची परिस्थिती आहे. जुन्या महापालिकेला औरंगाबाद आणि नवीन शहराच्या महानगरपालिका व डिएमआयसीला छत्रपती संभाजीनगर नामकरण करावे अशी मागणी पत्रकार परिषदेत समाजसेवक मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सत्तेवर असताना औरंगाबादचे संभाजीनगर व महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. म्हणून महाविकास आघाडी किंवा महायुतीवर आता आमचा विश्वास राहिलेला नाही. काँग्रेस व अजित पवार गटाने आपली भुमिका व एजंडा स्पष्ट करावा. मुस्लिम मतांसाठी राजकारण करु नये. मराठा समाजाने ज्याप्रकारे मनोज जरांगे पाटील यांच्यामागे आरक्षणाच्या मागणीसाठी जी ताकत उभी केली तशाच प्रकारे नामांतर व विविध प्रश्न सोडविण्यासाठी मुस्लिम समाजाने आपली ताकत दाखवावी असे आवाहन त्यांनी केले आहे. ऐतिहासिक शहराचे नाव परत मिळवून देण्यासाठी राजकीय लढाई लढण्यासाठी एकजूट होऊन विधानसभा निवडणुक लढवायचा निर्णय घेतला आहे. जनतेने साथ दिली तर या निवडणुकीत यश मिळू शकते असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
What's Your Reaction?