महात्मा गांधी जयंती निमित्त काँग्रेसने काढली शहरात प्रभात फेरी
महात्मा गांधी जयंती निमित्त प्रभात फेरीचे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजन
काँग्रेस पक्षा कडून महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त राजीव गांधी यांच्या पुतळया पासून गांधी पुतळा शाहगंज पर्यंत प्रभात फेरी!
छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी तर्फे महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त दिल्ली गेट येथील माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुतळयाला हार घालून महात्मा गांधी पुतळा शाहगंज पर्यंत पायी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. डॉ. कल्याण काळे व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी हातात फलक घेऊन अमर रहे, अमर रहे, महात्मा गांधी अमर रहे, जब तक सुरज चाँद रहेगा बापु तुम्हारा नाम रहेगाच्या जय घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हातात महात्मा गांधी यांच्या घोषणाचे फलक घेतले.
या प्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.डॉ. कल्याण काळे, शहर जिल्हा काँगेस कमिटीचे अध्यक्ष युसुफ शेख, माजी मंत्री अनिल पटेल, विलास औताड़े, योगेश मसलगे पाटील, किरण पाटील डोणगावकर, दिपाली मिसाळ, जगन्नाथ काळे, मोहन देशमुख, अनिस पटेल, भाऊसाहेब जगताप, किशोर तुळशीबागवाले, एड इकबाल सिंग गिल, डॉ. अरुण शिरसाठ, डॉ.पवन डोंगरे, जयप्रकाश नानवारे, सुरेश टाक, निमेश पटेल, असमत खान, रईस शेख, एम के देशमुख, इंजि. शेख इफ्तेखार,
लियाखत पठाण, शेख कैसर बाबा, बाबुराव कळसकर, आतिश पितळे, महेंद्र रमंडवाल ,मुदसिर अन्सारी, संतोष भिंगारे, आबेद जहागीरदार, संजय धर्मरक्षक, जावेद पठाण, चंद्रप्रभा खंदारे, योगेश थोरात, परवीन बाजी देशमुख, प्र रमाकांत गायकवाड, सलीम खान, सय्यद फैयाजुद्दीन, सूर्यकांत गरड, श्रीकृष्ण काकडे, जाफर खान, प्रतापसिंग होलिया, शफिक शहा, विनायक सरोदे, सुनील डोणगावकर, मजाज खान, जकी मिर्झा, कल्याण कावरे पाटील, शहबाज खान, अब्बास पठाण आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रभात फेरीमध्ये उपस्थित होते.
महात्मा गांधी पुतळा शाहगंज चमन येथे कार्यक्रमाचा समारोप झाला. यामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. डॉक्टर कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांचे भाषण झाले. आभार प्रदर्शन अनिस पटेल यांनी
केले.
What's Your Reaction?