देशमुख यांना समाजवादीने दिली मोठी जवाबदारी

 0
देशमुख यांना समाजवादीने दिली मोठी जवाबदारी

रिटायर्ड एसीपी डॉ. रियाजुद्दीन देशमुख यांची समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र सचिवपदी नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू असीम आझमी यांनी एक मोठा निर्णय घेत महाराष्ट्र पोलीस विभागातील डॅशिंग अधिकारी आणि रिटायर्ड असिस्टंट पोलीस कमिशनर डॉ. रियाजुद्दीन देशमुख यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या पोलीस विभागातील दीर्घ अनुभवामुळे समाजवादी पक्षाला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.

रिटायर्ड झाल्यानंतर डॉ. रियाजुद्दीन देशमुख औरंगाबाद येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी नेहमीच अन्यायग्रस्त आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मागील चार वर्षांपासून ते औरंगाबाद येथून 'सत्यपत्रक' या मराठी दैनिकाचे संपादन व प्रकाशन करत आहेत, ज्याद्वारे सामाजिक मुद्द्यांवर आवाज उठवला जातो.

आमच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर डॉ. रियाजुद्दीन देशमुख म्हणाले की, "औरंगाबादच नव्हे, तर महाराष्ट्रात कुठेही अत्याचार झाला तर मी अन्यायग्रस्तांसाठी आवाज उठवेन." त्यांनी असेही स्पष्ट केले की, समाजवादी पक्षाला महाराष्ट्रात अधिक बळकट करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहतील.

डॉ. रियाजुद्दीन देशमुख यांच्या पोलीस विभागातील अनुभव आणि सामाजिक कार्याचा मोठा फायदा पक्षाला होईल, असे समाजवादी पक्षाचे नेतृत्व मानत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नवा जोम मिळेल, अशी आशा आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow