डाॅ.गफार कादरी हातावर बांधणार घड्याळ...?

 0
डाॅ.गफार कादरी हातावर बांधणार घड्याळ...?

डाॅ.गफार कादरी हातावर बांधणार घड्याळ...?

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) -

समाजवादी पार्टीचे जेष्ठ नेते डाॅ.गफार कादरी 6 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटात जाहिर प्रवेश घेवून हातावर घड्याळ बांधणार असल्याची पोस्ट मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पुर्व विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या तिकीटावर त्यांनी निवडणूक लढले होते. राष्ट्रवादीत प्रवेश करणार म्हणून आमच्या प्रतिनिधीने त्यांना फोन केला तर संपर्क होऊ शकला नाही. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी त्यांच्या पक्ष प्रवेशाला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा निश्चित झाल्यानंतर ते आपल्या समर्थकांसोबत जाहिर प्रवेश करु शकतात. 6 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता त्यांच्या जटवाडा रोड येथील एज्युकेशन कॅम्पसमध्ये प्रवेश सोहळा आयोजित केल्याची निमंत्रण पत्रिका सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. त्यांचा राज्यात दांडगा जनसंपर्क, राजकीय अनुभव बघता अगोदर त्यांनी राष्ट्रवादी पक्षात विविध पदे भुषवली. दोनदा एमआयएम पक्षाकडून त्यांनी विधानसभा निवडणूक लढले. थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. एमआयएम पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदावर काम करत असताना गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सोशलमिडीयावर सुरु आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow