ईव्हीएमचा विरोध वाढत आहे, भडकलगेटवर केले धरणे आंदोलन

 0
ईव्हीएमचा विरोध वाढत आहे, भडकलगेटवर केले धरणे आंदोलन

ईव्हीएम हटाव साठी धरणे आंदोलन ! औरंगाबाद, दि.1(डि-24 न्यूज) निष्पक्ष, भयमुक्त व न्याय्य निवडणुका घेण्याची निवडणुक आयोगाची घटनात्मक जबाबदारी असल्याने कोणत्याही प्रगत देशात नसलेली शंकास्पद ईव्हीएम मशिन वापरुन निवडणुका न घेता बॅलेट पेपर वर 2024 लोकसभेच्या निवडणुका घ्या या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकाराने भडकल गेट येथे धरणे आंदोलन झाले. यात काॅग्रेस, राष्ट्रवादी ( शरद पवार गट), समाजवादी पक्ष व इत्यादी धर्मनिरपेक्ष पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

 याबाबत असे की, ईव्हीएम मशिन मुळे निवडणुका या शंकास्पद होऊ लागल्या आहेत, लवकर निकाल लावण्याचा अट्टहास देशाच्या निवडणुकांना संशयाच्या खाईत ढकलत आहेत, कोणत्याही प्रगत देशात बॅलेट पेपरवर निवडणुका होतात, ईव्हीएम मशिनद्वारे मुक्त व न्याय्य निवडणुका होऊ शकत नाहीत म्हणुन अमेरीका, इग्लंड, जर्मनी, फ्रान्स इत्यादी प्रगत देशांमध्ये बॅलेट पेपरवरच निवडणुका होतात, कोणताही पक्ष निवडणुका जिंकत असला तरीही ईव्हीएम नको अशीच भुमिका या धरणे आंदोलनात घेण्यात आली. ईव्हीएम मुळे लोकशाही धोक्यात आली आहे असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आली. ईव्हीएम हटाओ देश बचाओ, संविधान बचाओ देश बचाओ, मोदी हटाव देश बचाओ, बीजेपी हटाव देश बचाओ, देश की रक्षा कौन करेगा हम करेंगे - हम करेंगे. हिंदु मुस्लीम बौद्ध सिख ईसाई हम सब भाई भाई इत्यादी घोषणांनी भडकल गेट परिसर दणाणुन गेला. यावेळी माजी महापौर रशिद मामु, माजी नगरसेवक इलियास कीरमाणी, पञकार याहया खान, समाजवादी पार्टीचे अब्दुल रऊफ, काॅग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे हमद चाऊस, भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे साबेर शेख, मुकुल सोनवणे, मच्छिंद्र गोरडे, सुरेश सिरसिकर राष्ट्रवादी काॅग्रेस ( शरद पवार) चे शेख मसुद, मायनाॅरीटी कौन्सिलचे शेख अमीर यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अॅड अभय टाकसाळ, काॅ विकास गायकवाड, काॅ एजाज शेख, काॅ रफीक बक्श, काॅ आतिष दांडगे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सहभागी नेत्यांची भाषणेही यावेळी झाली. भडकल गेट येथे शिलालेखरुपी घटनेच्या प्रास्ताविकेचे वाचनही यावे॓ळी करण्यात आले, पुष्प अर्पण करीत डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन ही करण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow