हज हाऊस अमन, शांती, एकतेचे प्रतिक, या वास्तूचा राजकीय वापर होणार नाही - मंत्री अब्दुल सत्तार

 0
हज हाऊस अमन, शांती, एकतेचे प्रतिक, या वास्तूचा राजकीय वापर होणार नाही - मंत्री अब्दुल सत्तार

हज हाऊस अमन शांतीचे प्रतीक, येथे राजकीय बैठक होणार नाही - मंत्री अब्दुल सत्तार...

लेबर कॉलनी मैदानावर राज्यस्तरीय अल्पसंख्याक आयुक्तालय, अल्पसंख्याक विभाग व मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय दोन एकर जागेवर उभारणार, ऐतिहासिक आमखास मैदानावर भव्य क्रीडांगण आचारसंहिता लागण्याचे अगोदर उद्घाटन करण्याचे आश्वासन... सिल्लोड मध्ये हातगाडी चालवावणा-यास आज आयएएस आयपीएस सॅल्यूट करतात, हेलिकॉप्टर सिल्लोडला उतरवले एवढा सन्मान जनतेमुळे मिळाला आणखी काय पाहिजे...

हज हाऊस मराठवाड्यातील हज यात्रेकरूंना चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, राजकीय आघाडा बनू देणार नाही, येथे फक्त मुस्लिम धार्मिक विधीसाठीच वापर केला जाईल.... उद्यापासून येथील मस्जिदमध्ये होणार नमाज...

उद्घाटनासाठी गर्दी, पोलिसांचा बंदोबस्त...

औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज) हज हाऊस अमन शांतीचे प्रतीक आहे. येथे राजकीय आखाडा बनू देणार नाही. येथे कोणत्याही राजकीय पक्षाचे बैठक होणार नाही फक्त या वास्तूचा उपयोग धार्मिक कार्यासाठी होईल. येथे फक्त अल्लाहची बात होईल. नियमावली साठी 5 फेब्रुवारी रोजी आदेश काढणार आहे. 42 कोटी खर्च करुन सुसज्ज इमारत आहे. सर्व जाती धर्मातील लोक मला मते देऊन निवडून देतात मी त्यांची सेवा करतो. माझ्या कार्यकाळात पाच वेळेस मंत्री बनलो. माझ्याकडे अशी चाबी आहे ती कोणत्याही कुलुपाला लागते. मांडकी येथील वक्फ बोर्डाच्या जागेवर केजी टु पीजी शैक्षणिक संस्था उभारणार. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार. आयुक्तालय, अल्पसंख्याक विकास विभागाचे कार्यालय, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय एकच छताखाली लेबर कॉलनी मैदानावर उभारणार. लवकरच ऐतिहासिक आमखास मैदानावर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत फुटबॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे भुमिपूजन केले जाईल. उद्यापासून हज हाऊस इमारत येथील मस्जिदमध्ये नमाज अदा केली जाईल. या वास्तूची देखरेख, सुरक्षा व कर्मचाऱ्यांचा खर्च अल्पसंख्याक विकास विभाग करणार आहे. वक्फ बोर्ड ट्रिब्युनल इमारतीचे उद्घाटन 5 फेब्रुवारी पर्यंत होईल. मराठवाड्यातील हज यात्रेकरूंसाठी उपलब्ध करून दिली आहे. हज यात्रेसाठी 80 हजार लागत असल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत मुद्दा उपस्थित करावे. गरीबांना हज यात्रा करता यावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हज हाऊस साठी योगदान देणाऱ्यांचे आभार अब्दुल सत्तार यांनी मानले. हज हाऊसचे लोकार्पण सोहळ्यात अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणात सांगितले. अब्दुल सत्तार यांनी शेवटी सांगितले की भुमिपूजन वेळी मी होतो आणि या हज हाऊसचे उद्घाटन करण्यासाठी मला अल्पसंख्याक विकास मंत्रीचे सौभाग्य प्राप्त झाले. याबद्दल मी समाधानी आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणात आमखास मैदानावर लवकर आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे भुमिपूजन करावे त्यासाठी केंद्राकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न करणार शासन स्तरावर लवकरच उद्घाटन करण्यासाठी मागणी केली आहे.

वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यालय संबंधी चेअरमन डॉ.वजाहत मिर्झा यांनी मागणी करताच लवकर कार्यालय शिफ्ट केले जाईल असे मंत्री अब्दुल सत्तार यांनी आश्वासन दिले.

वंदेमातरम सभागृहासाठी 40 वर्ष प्रतिक्षा करावी लागली. गरीबांना हज यात्रा करता यावी यासाठी प्रयत्न करावे असे माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले.

हज हाऊसचा उपयोग शैक्षणिक कामासाठी पण करावे असे आवाहन केले. यावेळी आमदार उदयसिंह राजपूत यांनी हज हाऊस बनल्याने यात्रेकरूंना सुविधा उपलब्ध होईल यासाठी समाधान व्यक्त केले.

राज्य हज कमेटीचे अध्यक्ष आसिफ खान यांनी आपले विचार व्यक्त करताना मुस्लिम समाजाला शुभेच्छा दिल्या.

हज कमेटी ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकारी इम्तियाज काजी यांनी प्रास्ताविक केले. सिडकोचे मुख्य अभियंता एन.बायस यांनी सुविधेची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सुरुवातीला जामा मस्जिदचे इमाम हाफिज झाकीर यांनी कुरान पठन केले.

याप्रसंगी सिडकोचे मुख्य प्रशासक शंतनू गोयल, मनपा प्रशासक तथा आयुक्त जी.श्रीकांत, प्रभारी जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, हुज्जाज कमेटीचे अध्यक्ष मौलाना नसिमोद्दीन मिफ्ताई, सेंट्रल हज कमेटीचे सदस्य हाजी एजाज देशमुख, वक्फ बोर्डाचे सीईओ या.बो.ताशिलदार, अब्दुल मुकीम देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सुत्रसंचलन सोहेल जकीयोद्दीन यांनी केले. वंडर कन्स्ट्रक्शन व एलोरा कन्स्ट्रक्शनच्या वतीने मोठा हार घालून अब्दुल सत्तार यांचे भव्य सत्कार करण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow