सिल्लोडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी जास्त चुरस, 17 उमेदवारी अर्ज, कन्नडमध्ये सर्वात कमी उमेदवार...
नगराध्यक्ष पदासाठी सिल्लोडमधून सर्वात जास्त उमेदवार, शेवटच्या दिवसापर्यंत 1312 उमेदवारांचे अर्ज दाखल...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) - नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व सदस्य पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. जिल्ह्यातील सहा नगरपरिषद व नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी एकूण 88 अर्ज तर सदस्य पदासाठी उमेदवारांनी 1312 अर्ज दाखल केले. सर्वात जास्त नगराध्यक्ष पदासाठी 17 अर्ज दाखल झाले आहेत तर सर्वात कमी कन्नड नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल झाले आहेत.
सिल्लोड येथील नगरपरिषद सदस्य पदासाठी एकूण 229, कन्नड 192, पैठण 290, वैजापूर 210, गंगापूर 128, खुलताबाद 126, फुलंब्री 132 असे एकूण 1312 अर्ज दाखल झाले आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी सिल्लोड 17, कन्नड 6, पैठण 14, वैजापूर 8, गंगापूर 15, खुलताबाद 16, फुलंब्री 12 असे एकूण 88 अर्ज दाखल झाले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहा आयुक्त ॠषीकेश भालेराव(न.प.प्र) यांनी दिली आहे.
What's Your Reaction?