लौकिक खंदारे यांच्या सह शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश...!
लौकिक खंदारे यांच्या सह शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज) - सामाजिक कार्यकर्ते लौकिक खंदारे यांच्या सह शेकडो युवा कार्यकर्ते व आयटी, इंजिनियर, एमबीए क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आज भाजपात जाहिर प्रवेश केला.
याप्रसंगी लौकीक खंदारे यांच्या सह ऋषिकेश म्हस्के, रोहित सरकटे, प्रथमेश चव्हाण, आदीत्य तांबे, पीयूष कुलकर्णी, बबलू त्रिगोटे, अमेय घाडमोडे, जय मंडोरे, ज्ञानेश्वर वाणी, सोहम महातोले यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे महामंत्री तथा आमदार संजय केनेकर, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या पुढाकाराने मंडळ अध्यक्ष मंदिप राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.
यावेळी अॅड ताराचंद गायकवाड, रामेश्वर भादवे, राजू बागडे, राजू खांजेकर, निखिल महाले, गणेश कवाळे पाटील, सौरभ तोतरे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?