विजय वाहुळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने आंबेडकरी समाज अक्रामक, काढणार मोर्चा...?
विजय वाहुळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने आंबेडकरी समाज अक्रामक, काढणार मोर्चा...?
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज)- विद्यार्थ्यांना शैक्षणिक का करु द्यावे त्यांना कशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य बणवून धर्मांधता शिकवता. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणीसाठी टेबल लावल्याने आंबेडकरी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते विजय वाहुळ यांनी अक्रामक होत विरोध केला होता. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले होते. परंतु यानंतर विजय वाहुळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने आंबेडकरी समाज अक्रामक झाला आहे. हा एफआयआर पोलिसांनी मागे घेण्यात यावा. यासाठी पोलिस आयुक्त प्रविण पवार यांची भेट घेऊन मागणी करणार आहे. एफ आय आर रद्द झाला नाही तर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरुन मोर्चा काढणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनी दिला आहे.
सुभेदारी विश्रामगृहात रविवारी सकाळी आंबेडकरी समाजाच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती माध्यमांना दाभाडे यांनी दिली आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दबावाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला.
What's Your Reaction?