विद्यापिठात युपिएससी, एमपीएससी, पोलिस भरती मार्गदर्शन वर्ग जानेवारीपासून
विद्यापिठात युपिएससी, एमपीएससी, पोलिस भरती मार्गदर्शन वर्ग जानेवारीपासून
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्री आय.ए.एस. आणि नेट सेट कोचिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. इच्छुक पदवीधर व पदवीपूर्व महाविद्यालयीन शिक्षणक्रमास(प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष) असलेल्या विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन वर्गाकरीता अर्ज मागवले जात आहे अशी माहिती कोचिंग सेंटरचे संचालक डॉ.सादीक एन.बागवान यांनी दिली आहे.
पोलिस भरतीसाठी तीन महीने, सरळसेवा भरती(MPSC Combine (कालावधी सहा महिने), युपिएससी, एमपीएससी-2025 new pattern कालावधी सहा महिने या वर्ग 6 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे. यासाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज मागवले जात आहे. अर्ज व इतर माहितीसाठी संकेतस्थळ www.bamu.ac.in/preias/Home.aspx
विभागाचा संपर्क क्रं.9604150140/9923523444 आहे.
What's Your Reaction?