स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संदर्भात निवडणूक आयोगाकडून आढावा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात निवडणूक आयोगाकडून आढावा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि: 28(डि-24 न्यूज) : विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांबाबत 29 जुलै रोजी निवडणूक आयोगाकडून विभागवार आढावा घेण्यात येणार आहे. आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात होणार असून राज्य निवडणूक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सकाळी 10.00 वाजता 8 जिल्हा परिषदा व 76 पंचायत समित्या, 49 नगरपरिषदा व 3 नगर ग्रामपंचायत, तसेच दुपारी 03.30 वाजता 5 महानगर पालिकेच्या निवडणुकांसंदर्भात आढावा घेण्यात येणार आहे.
What's Your Reaction?






