दिव्यांग विद्यार्थ्यांचे आरोग्य निदान व उपचार शिबीर संपन्न...

दिव्यांग विद्यार्थ्यांचे आरोग्य निदान व उपचार शिबीर संपन्न...
सिल्लोड, दि.29(डि-24 न्यूज) -
अखिल भारतीय शिक्षा समागम (ABSS) सप्ताह निमित्त समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सिल्लोड तालुक्यातील विविध प्रकारच्या विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग (बालकाची) विद्यार्थ्यांसाठी औपचारिक कार्यात्मक वैद्यकीय निदान व उपचार शिबिर संपन्न झाले.
सदरील शिबिरासाठी सिल्लोड तालुक्यातून अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळे मधून मोठ्या प्रमाणात विशेष गरज असणारी बालके उपचारात्मक मार्गदर्शन व प्राथमिक तपासणी करण्यासाठी उप जिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे दि.29 जुलै 2025 आयोजित करण्यात आले होते वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश विसपुते , RBSK डॉ.सर्व टीम साईनाथ कुऱ्हाडे, राम बुरकुल, संजय मगर, रामेश्वर फाळके, सदिया शेख, जुनेद देशमुख, कुरूत्तूल खान, नितीन सावळे, संगिता जाधव, उज्वला म्हस्के, छाया देवकर, अमृता कुलकर्णी, सुरेखा पचलोरे यांनी सदर तपासणी केली. सदरील तपासणी शिबीर हे गट शिक्षणाधिकारी अनिल पवार, गट समन्वयक रामचंद्र मोरे, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजु फुसे, रमेश ठाकूर, दादाराव फुसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. शिबिराचे उत्कृष्ट नियोजन विशेष तज्ञ काळम पाटील आर यु., ढवळे आर एम.वरिष्ठ लेखाधिकरी संजय पाटील यांनी केले तर वैद्यकीय तपासणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी समावेशित शिक्षण रिसोर्स टीचर संजय सोनकांबळे, समाधान काकडे, सुरेश लांडगे, ए.ए. सय्यद ,व्ही आर ताबोळी यांनी काम पाहिले.
What's Your Reaction?






