आमखास मैदानावर एज्युकेशन एक्सपोचे आयोजन, विद्यार्थी, शिक्षकांनी लाभ घेण्याचे आवाहन
आमखास मैदानावर एज्युकेशन एक्सपोचे आयोजन, विद्यार्थी, शिक्षकांनी लाभ घेण्याचे आवाहन
विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी स्काॅलर्शिपची समस्या, नोकरीची संधी, शिक्षणात खडतर प्रवास योग्य बनवण्यासाठी मार्गदर्शन या एज्युकेशन एक्सपोत मिळणार आहे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवून या संधीचा लाभ घेण्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज) ऐतिहासिक आमखास मैदानावर एज्युकेशन एक्सपो-2024 चे आयोजन 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान शहरात होणार आहे. शहरात तिस-यांदा हे आयोजन करण्यात येत आहे. या एक्सपोचा उद्देश हा आहे विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणात गळती कमी व्हावी. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन उच्च शिक्षण घेण्यासाठी आत्मविश्वास वाढला पाहिजे. शिक्षणात प्रगती करुन देशाचे नावलौकिक करावे. शिक्षकांसाठी पण या एक्सपोत शिकण्यासारखे खूप काही ग्रुप डिस्कशन, विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्स, शिक्षणाचे सुविधा, अभ्यासासाठी मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी विश्वविख्यात शिक्षातज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. एकूण 137 पुस्तक व विविध शैक्षणिक आणि फुड स्टालचे आयोजन करण्यात आले आहे. मागिल एज्युकेशन एक्सपोत पाच लाख विद्यार्थी व शिक्षकांनी भेट दिली होती यावर्षी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून माइंडस इन मोशन फाऊंडेशनचे अध्यक्ष बासित सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
यावेळी सफर खान, सुलैमान शाहीन, नोमान सौदागर, आदील अजिज सिद्दीकी, बदर बिन सुलैमान यांची उपस्थिती होती.
त्यांनी पुढे सांगितले 15 डिसेंबर 2024, रविवारी दुपारी 2 ते 5.30 वाजे दरम्यान उद्घाटन समारंभ होईल. या उद्घाटन समारंभात एमजीएम विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.अंकुशराव कदम, महापालिकेचे आयुक्त जी.श्रीकांत, शिक्षातज्ञ शेषराव चौव्हान, ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सेक्रेटरी मौलाना उमरैन महेफुज रहेमानी, जामिया इस्लामिया इशाअतूल उलूम, अक्कलकुवाचे अध्यक्ष मौलाना हुजैफा वस्तानवी, अल जामिया मोहंमदीया एज्युकेशन सोसायटी(JMES) चे अध्यक्ष मौलाना अरशद मुख्तार, इस्लामिक रिसर्च सेंटरचे अध्यक्ष अॅड फैज सय्यद, जमात-ए-इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष एस. आमीनुल हसन, इकरा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष, जळगाव, डॉ.अब्दुल करीम सालार उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत मौलाना अरशद मुख्तार, मौलाना हुझैफा वस्तानवी, एस.अमीनूल हसन शिक्षणावर मार्गदर्शन करतील. अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
16, 17, 18, 19, 20, 21, 22 शिक्षणावर भर देण्यासाठी शिक्षातज्ञ मार्गदर्शन करणार आहे.
What's Your Reaction?