परभणी बंदला हिंसक वळण, मुख्यमंत्र्यांनी जवाबदारी स्विकारुन राजिनामा द्यावा
भारतीय संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी परभणी बंदला हिंसक वळण लागल्याची जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा....
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) चे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांची मागणी..
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज)
परभणी शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची मंगळवारी एका समाज कटंकाने विटंबना केली. या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी 11 डिसेंबरला पुकारलेल्या परभणी बंदला हिंसक वळण लागले आहे. बंदच्या काळात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. जेव्हा जेव्हा राज्यामध्ये भाजपचे सरकार येते तेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही. भीमा कोरेगाव दंगल असेल किंवा अजून कितीतरी घटना असतील अशा अनेक जातीय दंगली महाराष्ट्रात भाजपच्या काळात घडतं आलेल्या आहेत. महापुरुषांचे स्मारक, प्रतीके सुरक्षा, दलिंताची सुरक्षा, राखण्यात भाजप अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) चे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी वृत्तपत्राला दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
त्यांनी हि मागणी प्रसिध्दीपत्रकात केली आहे...
भारतीय संविधान विटंबना प्रकरणी मुख्य सूत्रदार कोण आहे याचा तपास जलद गतीने होऊन मुख्य आरोपीला तात्काळ बेड्या ठोकून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.
आरोपीची नार्को टेस्ट करून मुख्य सुत्रदार कोण याचा शोध घ्यावा.
बंद दरम्यान झालेल्या नुकसानीस दलितांना जबाबदार धरू नये. आणि कोंबिंग ऑपरेशन करून दलितांना टार्गेट करून गुन्हे दाखल करू नये.
आरोपीची केस फास्टट्रॅक कोर्टात चालवावी.
महाराष्ट्रातील महापुरुषांची स्मारके सिसीटीव्हीच्या निगराणीत सुरक्षित असावी त्यासाठी उपाय योजना कराव्यात.
What's Your Reaction?