" देश की आंधी... राहुल गांधी" भाजपाच्या विरोधात काँग्रेस अक्रामक
राहुलजी गांधी यांना भाजपने रावणाची उपमा देणा-या भाजपा विरोधात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन
औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) भाजपने गुरुवारी सोशल मिडीया हॅडलवर राहुल गांधी यांचे पोस्टर जारी केले होते. त्यामध्ये असे दाखविण्यात आले की रावणाची उपमा देण्यात आली. व त्यांचा अपमान करण्याचा वेळोवेळी भाजपने प्रयत्न केला आहे. दिवसेंदिवस राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढत असल्यामुळे भाजप त्यांना घाबरलेला आहे. कारण राहुल गांधी सतत गोर गरीब जनता महिला शैक्षणिक, युवक यांचे प्रश्न उपस्थित करुन भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी यांची प्रतिमा खराब व्हावी म्हणून रावणाची उपमा देण्याचा पाप केले आहे. या करिता भाजपाचा निषेध म्हणून पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे जिल्हा कॉगेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.कल्याण काळे व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांच्या सन्मानामध्ये घोषणा देण्यात आल्या, देश की आंधी राहुल गांधी, राहुल गांधी आप संघर्ष करो हम आपके साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ.जफर खान, भाऊसाहेब जगताप, दिपाली मिसाळ, अरुण शिरसाठ, संदीप बोरसे, राहुल सावंत, अॅड.एकबालसिंग गिल, अॅड.सयद अकम, महेंद्र रमंडवाल, उमाकांत खोतकर, डॉ.निलेश अंबेवाडीकर, संतोष भिंगारे, पवन डोंगरे, शेख रईस, शेख कैसर बाबा, आसमत खान, साहेबराव बनकर, श्रीकृष्ण काकडे, नदीम सौदागर, जमील पटेल, सलीम खान, सय्यद फैयाजोददीन, परीगा खंडागळे, सविता म्हस्के, दिक्षा पवार, अनिता भंडारी, सय्यद रुबीना, नंदा घोरपडे, वैशाली तायडे, सुहासिनी घोरपडे, आकाश रगडे, आसित सरवदे, विजय कांबळे, सुर्यकांत गरड पाटील, आमजद खान, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?