औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतरावरावर 12 ऑक्टोबर रोजी पुन्हा सुनावणी

 0
औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतरावरावर 12 ऑक्टोबर रोजी पुन्हा सुनावणी

औरंगाबाद शहर नामांतरावर पुढील सुनावणी 12 ऑक्टोबर रोजी

मुंबई, दि.6(डि-24 न्यूज)

मुंबई उच्च न्यायालयात आज दुपारी 4.30 वाजेपर्यंत औरंगाबाद शहराच्या नामांतरावरावर न्यायालयासमोर सुनावणी झाली. पुढील सुनावणी 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे. अशी माहिती डि-24 न्यूजला याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी दिली आहे. या दोन्ही शहराच्या नामांतरावरावर दोन दिवस सुनावणी झाली तरीही पूर्ण झाली नाही आता 12 ऑक्टोबर रोजी पुन्हा उच्च न्यायालयाने सुनावणी ठेवली आहे.

उस्मानी यांनी औरंगाबाद शहर नामांतरावरावर आज सुध्दा सुनावणी झाली असे सांगितले.

मुख्य याचिकाकर्ते मुश्ताक अहमद यांचे वकीलांनी शहराची ऐतिहासिक ओळख, पर्यटनाचा वारसा लाभलेल्या व केंद्र शासनाच्या गाईडलाईन नुसार शहराचे नाव बदलता येणार नाही या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती द्यावी असा युक्तिवाद उशिरापर्यंत याचिकाकर्ते अॅड युसुफ मुशाला यांनीही जास्त वेळ युक्तिवाद करुन आपली बाजू मांडली. शासनाच्या वतीने महाअधिवक्ता वीरेंद्र सराफ उपस्थित होते.

मागिल वेळी औरंगाबाद विभाग जिल्हा तालुका व गावाच्या नावावर सुनावणी झाली पण न्यायालयाने तो निकाल राखून ठेवला आहे.

आज झालेल्या औरंगाबाद शहर व उस्मानाबाद शहर नामांतरावरावर सुनावणी झाली. औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे नामांतर धाराशिव शासनाने केले आहे. या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

12 ऑक्टोबर रोजी सुनावणी झाल्यानंतर औरंगाबाद शहर, विभाग जिल्हा तालुका व गावाच्या नामांतरावरावर निर्णय येण्याची अपेक्षा आहे.

याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांच्या वतीने अॅड.एस.एस.काझी उपस्थिति होते. त्यांच्या सोबत अॅड खिजर पटेल, अॅड सलीम कादरी, अॅड मोइन शेख न्यायालयात उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow