मोकाट कुत्रे आवरा, राष्ट्रवादीचे मनपा प्रशासनाला निवेदन

 0
मोकाट कुत्रे आवरा, राष्ट्रवादीचे मनपा प्रशासनाला निवेदन

मोकाट कुत्रे आवरा, राष्ट्रवादीचे मनपा प्रशासनाला निवेदन 

औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) शहरातील विविध नागरी समस्यांवर शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेचे प्रशासक जी.श्रीकांत यांना आज जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विविध मागणीचे निवेदन दिले.

शहरातील मोकाट व आवारा कुत्रे तसेच जनावरांचा बंदोबस्त करावा.

शहरात उड्डाणपुलाखालील रिकाम्या असलेल्या जागेचा गैरकृत्यासाठी वापर होत असतो त्यामुळे जनतेच्या सुविधेसाठी त्याठिकाणी सार्वजनिक शौचालय तसेच वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात यावी.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. बहुतांशी ठिकाणी 8 ते 10 दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे कृपया या बाबतीत तातडीने कार्यवाही करुन किमान एक दिवसाआड पिण्याचे पाणी उपलब्ध होईल याबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात यावे.

शहरातील नागरिकांना घरपट्टी ही अव्वाच्या सव्वा टाकून नोटीस दिल्या जात आहे. तरी योग्य तो कर लावण्यात यावा.

विनावापर असलेल्या नागरिकांच्या नळाचे कनेक्शन तपासणी करुन त्वरीत नळपट्टी बंद करण्यात यावी. व यापुर्वी अशा दिलेल्या नळपट्टीच्या नोटीसा रद्द करण्यात याव्यात. 

वरील गंभीर बाबीकडे आपले लक्ष वेधण्यात येत असुन आपल्या स्तरावरुन या बाबतीत पुर्तता करण्यात यावी, अन्यथा नाईलाजास्तव पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी. असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

याप्रसंगी सुधाकर सोनवणे, राज्य प्रवक्ते सुरजितसिंग खुंगर, मोतीलाल जगताप, सोमिनाथ शिराणे, मेहराज पटेल,एड लक्ष्मण प्रधान, सत्यजित वाघ, प्रा.सलिम शेख आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow