अग्रक्रम ठरवून प्रलंबित कामांना गती द्या - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 0
अग्रक्रम ठरवून प्रलंबित कामांना गती द्या - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

अग्रक्रम ठरवून प्रलंबित कामांना गती द्या- जिल्हाधिकारी स्वामी      

छत्रपती संभाजीनगर, दि.26(डि-24 न्यूज):- जिल्ह्यातील महत्त्वाच्या व जनसामान्यांच्या दृष्टिने जिव्हाळ्याच्या विषयांचा अग्रक्रम ठरवून प्रलंबित कामांना गती द्यावी,असे निर्देश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, उपजिल्हाधिकारी रामदास दौड, एकनाथ बंगाळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी ज्या प्रकल्पांचे भूसंपादन प्रलंबित आहे असे विषय प्राधान्याने मार्गी लावावे. जनसामान्यांच्या सेवेच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांच्या प्रगतीचा आढावा दररोज सादर करावा. प्रत्येक विभागनिहाय आगामी १०० दिवसांत प्रलंबित व नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या कामांच्या प्रगतीबाबतचे संभाव्य नियोजन सादर करावे व त्यानुसार कामे मार्गी लावावीत. याच प्रमाणे संवेदनशील विषय, न्यायालयीन प्रकरणे इ. विविध विषयांबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow