सालारजंगच्या स्वयंपाकीच्या वंशजाने भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटींची प्राॅपर्टी भेट कशी दिली...?
सालारजंगच्या स्वयंपाकीच्या वंशजाने भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटींची प्राॅपर्टी भेट कशी काय दिली...?
सालारजंग सेकंड मीर युसुफ अली यांचे कझन(नवासे) ऐहतेशाम अली खान यांचे जीपीए होल्डर हारुण अन्सारीचा जावेद रसुल शेख यांच्या हिबानामावर आक्षेप, वंशजाच्या प्राॅपर्टीची वाटणी झाली नसताना हिबानामा कसा करुन दिला, मीर महेमुद अली यांच्याशी व्यवहार न करण्याचे आवाहन, बायजीपुरा, निरालाबाजार, काल्डा काॅर्नर जालना रोड, मजनूहिल रशिदपुरा येथे सालारजंग येथे शेकडो एकर जमीन असल्याचा दावा...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज)
जालना रोड येथील दाऊदपुरा येथील जवळपास दिडशे कोटींची 3 एकर जमीन खासदार संदीपान भुमरेंचे ड्रायव्हर जावेद रसुल शेख यांना सालारजंगचे स्वयंपाकीचे वारसदार मीर महेमुद अली खान यांनी मुस्लिम शरीयत कायद्यानुसार ब्लड रिलेशन नसताना हिबानामा(भेट) म्हणून कशी दिली याबद्दल एका पत्रकार परिषदेत सेकंड सालारजंग मीर युसुफ अली यांचे कझन(नवासे) ऐहतेशाम अली खान यांचे जीपीए होल्डर हारुन अन्सारी यांनी आक्षेप घेतला आहे. या जमीनीची वाटणी झाली नसताना सर्वे नं.3, ब्लाॅक 14 हा नंबर कसा देण्यात आला यांची चौकशी करावी. बेकायदेशीर हिबानामा बद्दल आम्हाला आक्षेप आहे याबाबत न्यायालयात जाणार. बोगस मंडळी शहरात कोट्यावधींची बोगस व्यवहार करुन लूट करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्यापासून सावध राहावे कायदेशीर कागदपत्रे आमच्याकडे आहे सालारजंग मालमत्तेचे व्यवहार करण्यापूर्वी आमच्याशी संपर्क करावा नसता तुमची फसवणूक होईल असे आवाहन हारुण अन्सारी यांनी केले आहे. यावेळी एड प्रिया अहिरे यांची उपस्थिती होती.
सालारजंग मालमत्ते बद्दल अन्सारी यांनी पार्श्वभुमी सांगितली
निजाम सरकारच्या काळात महाराष्ट्र स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर हैदराबाद स्टेट चे पंतप्रधान सेकंड सालाजंग मीर युसुफ अली खान यांना वारसदार नव्हते. त्यांच्या शेकडो एकर जमीनीवर हक्कासाठी आंध्रप्रदेश हायकोर्टात 1958 साली प्राॅपर्टीवर 1200 ते 1250 लोकांनी दावा केला. ते त्यांच्या घरात काम करणारे स्वयंपाकी, ड्रायव्हर व इतर सेवेकरी होते. न्यायालयाने त्यामधून 124 केसची सुनावणी घेण्याचे मान्य केले. सेवानिवृत्त आयएएस अधिकारी नजब अली खान यांनी वारसांची चौकशी करुन रिपोर्ट न्यायालयासमोर सादर केला. हैदराबाद येथील प्राॅपर्टीचा सुगावा लागला नाही तर छत्रपती संभाजीनगर येथे शेकडो एकर जमीन मिळाली त्याची वाटनी न होता या शहरात बेकायदेशीर व्यवहार केले जात आहे. असा आरोप
यामध्ये मीर युसुफ अली खान यांचे कझन(नवासे) ऐहतेशाम अली खान यांच्याकडे कोर्टाचे सक्सेशन सर्टिफिकेट आहे. चार ठिकाणी या मालमत्ता आहे यामध्ये साडे सहा ब्लाॅकवर ऐहतेशाम अली खान यांचा वाटा आहे मग त्यांना विश्वासात न घेता मीर महेमूद अली यांनी जावेद रसुल शेख यांना हिबानामा कसा काय करुन दिला, त्यांचे ब्लड रिलेशन आहे का...? हिबानामा केल्यानंतर जावेद रसुल हे मीर महेमुद अली यांच्या विरोधात न्यायालयात गेले की जेवढी जमीन हिबानामावर भेट म्हणून दिली तेथे उपलब्ध नाही यावर आमचा आक्षेप आहे. मीर ऐहतेशाम अली खान यांचे जीपीए होल्डर एड हारुण अन्सारी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. नंतर कायदेशीर पेच वारसदारांकडून आले तर जावेद रसूल यांच्या अडचणी वाढतील. त्यांच्या पाठीमागे जे राजकीय नेते आहेत त्यांचीही बदनामी या प्रकरणात होऊ शकते असा इशारा अन्सारी यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
कोठे कोठे आहे सालारजंग मालमत्ता
बागशेरगंज (बायजिपूरा) जालना रोड, काल्डा काॅर्नर, दाऊदपुरा, मालजीपुरा (निराला बाजार, मजनूखुर्द (मजनू हिल, रशिदपुरा) येथे मालमत्ता आहे. आंध्र प्रदेश हायकोर्टाने मान्य केलेला मालमत्तेचा नकाशा आमच्याकडे आहे.
या मालमत्तेचे 16 ब्लाॅक बनवले आहे. एका ब्लाॅकमध्ये 7 लाख 32 हजार स्क्वेअर फिट जागा आहे यामध्ये साडेसहा ब्लाॅकवर ऐहतेशाम अली यांचा दावा आहे.
आंध्र प्रदेश हायकोर्टाने सेवानिवृत्त आयएएस अधिकारी नजबअली खान यांच्या देखरेखीखाली चौकशी समीती नेमली होती त्यांच्या अहवालानुसार या मालमत्तेची वाटणी वारसदारांना करायची आहे परंतु निराला बाजार(मालजीपुरा) अंबीया मस्जिद जवळील तुराब अलीजंग खान यांच्या मालमत्तेतील एक प्लाॅट 2018 साली नेवासा येथील शिवाजी पाठक यांच्याकडून कोट्यावधी रुपये घेऊन मीर महेमुद अली यांनी रजिस्ट्री करुन विक्री करत फसवणूक केली. त्या व्यवहाराची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेने केली त्यानंतर सरकारने ती रजिस्ट्री रद्द ठरवली. त्यावेळेस सुध्दा मीर महेमुद अली चौकशीला सामोरे गेले नाही जावेद रसुल यांच्या प्रकरणात सुध्दा ते चौकशीला हजर होत नसल्याने काहीतरी गौडबंगाल आहे. पुण्यातील एक मालमत्ता तय्यबा फातेमा व महेमुद अली हे विक्री करण्यासाठी प्रयत्न करत आहे यांच्यापासून सावध राहावे. जालना रोड येथील प्रकरणात हिबानामाच्या नावावर सरकारचा महसूल बुडाला आहे. या प्रकरणात राजकीय दबावतंत्राचा उपयोग केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. ज्या मालमत्तेवर घरे बांधली गेली गरीबांना त्रास देण्याचा आमचा हेतू नाही परंतु संबंधितांनी आपली कागदपत्रे लिगल करण्यासाठी आमच्याकडे संपर्क करावे असे आवाहन हारुन अन्सारी यांनी केले आहे.
What's Your Reaction?