आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांचे समायोजनेसाठी कामबंद आंदोलन, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण

 0
आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांचे समायोजनेसाठी कामबंद आंदोलन, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण

आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांचे समायोजनेसाठी कामबंद आंदोलन, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण

औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज) राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांनी आजपासून प्रलंबित मागणीसाठी कामबंद आंदोलन केल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण पडून रुग्णांना उपचारासाठी त्रास होणार आहे.

राज्यातील हजारो कर्मचारी हे अत्यल्प मानधनावर गेली 18 वर्षांपासून आरोग्य सेवा शहर व ग्रामीण भागात देत आहे. जीवाची पर्वा न करता कोविड महामारीत सुध्दा काम केले. काहींना आपला जीव गमवावा लागला. 25 ऑक्टोबर पासून राज्यात कामबंद आंदोलन सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांनी आजपासून समायोजन करावे या मागणीसाठी कामबंद आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

निवेदनात या आहे मागणी...

वयाची अट शिथिल करुन नियमित रिक्त पदांवर समायोजन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय सरकारने घ्यावा. तांत्रिक व अतांत्रिक पदावर कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे सेवा प्रवेश नियमित त्वरित तयार करून तात्काळ सेवा समायोजन करण्यात यावे.

सेवा प्रवेश नियम हे तयार आहेत त्या पदाचे प्रथम टप्प्यात सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामविकास विभागाच्या आरोग्य विभागातील मंजूर रिक्त पदांवर थेट सेवा समायोजन करण्यात यावे.

एनएचएम अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांचे सेवा समायोजन होईपर्यंत समान काम, समान वेतन धोरण लागू करावे. एच.आर.पाॅलीसी लागू करावी. ईएसआयसी व ईपिएफ योजनेचा लाभ त्वरित द्यावा. सन 2018 मध्ये वेतन सुसुत्रीकरणात जुन्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अन्याय झालेला आहे. त्यांना कुठल्याच प्रकारची वेतनवाढ देण्यात आली नाही. अशा अधिकारी कर्मचारी यांना त्वरित सन 2018 पासून वेतन सुसुत्रीकरणाचा लाभ पर्वलक्षी प्रभावाने तात्काळ देण्यात यावे. शासकीय नियमाप्रमाणे अर्जित वैद्यकीय रजेचा लाभ तात्काळ द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

याप्रसंगी चंदन गणोरे, डॉ. सविता तांबे, सचिन काशिद, कृष्णा सुरडकर, डॉ.विनायक मुंडे, संदीप पवार उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow