पाण्यासाठी तीन तास जालना रोड जाम...आंदोलक अक्रामक...पाणी सोडणार नाही तोपर्यंत रस्ता रोखणार
पाण्यासाठी तीन तास जालना रोड जाम...आंदोलक अक्रामक...पाणी सोडणार नाही तोपर्यंत रस्ता रोखणार...रस्ता बंद असल्याने आंदोलक व वाहनधारकांमध्ये काही वाद निर्माण झाल्याने मध्यस्थी करून त्यांना शांत करण्यात आले...
औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज) गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळासमोर जालना रोड तब्बल तीन तास आंदोलकांनी रोखून धरल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाल्याने वाहनांची दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
यावेळी रुग्णांना घेऊन जाणा-या वाहनांना आंदोलकांनी रस्ता करुन दिला. जायकवाडीत पश्चिम महाराष्ट्रातील धरणातून 8.6 टीएमसी पाणी सोडण्याचे ऑक्टोबर मध्ये आदेश निघाले तरीही आतापर्यंत पाणी सोडल्याने मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी, शेतकरी, उद्योजक व जनतेमध्ये रोष आहे. मराठवाड्यात दुष्काळ असताना पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे तरीही सरकार पाणी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या दबावाखाली सोडत नसल्याने मराठवाडा पाणी हक्क परिषद अक्रामक आंदोलन सुरू केले आहे.
आजच पाणी सोडण्याचे निर्णय घेतला नाही तोपर्यंत रस्ता सोडणार नाही अशी भुमिका आंदोलकांनी घेतल्याने प्रशासनाची दमछाक उडाली.
माजी मंत्री राजेश टोपे यांनी आपल्या भाषणात सांगितले ऑक्टोबर महिन्यात पाणी सोडण्याचे आदेश असताना 20 दिवसांचा विलंब झाला तरीही सरकारने पाणी सोडण्याचे नियोजन केले नाही. दरदिवशी मराठवाड्यात तीन शेतकरी आत्महत्य करत आहे. चारा पाण्याचा शेती उद्योग डबघाईस आले आहे. पाणी नसल्याने नवीन उद्योग यायला तयार नाही मग रोजगार निर्मिती कशी होणार. उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने हाताला काम नाही. न्यायालयाचे आदेश असताना अंमलबजावणी होत नाही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी याचिका टाकली. आदेशाला स्थगिती नसताना हक्काचे पाणी सोडले जात नसल्याने किती दिवस मराठवाड्याला मागास ठेवणार. गेली 70 वर्षांपासून 21 वर्ष मराठवाड्याने दुष्काळ भोगला आहे. सध्या दुष्काळ असताना पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना पश्चिम महाराष्ट्रातील नेते पाणी अडवण्याचे काम करत आहे त्यांनाही धडा शिकवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दुध विक्रीसाठी मराठवाड्यात येतात तर येथील उस तिकडे नेतात आता आम्ही पण ते अडवायचा का...असे त्यांनी ठणकावून सांगितले.
शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट हे पण यावेळी संतप्त झाले. त्यांनी सांगितले मी सत्तेत असलो तरीही हक्काचे पाण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे. हिवाळी अधिवेशनात सहभाग घ्यायचा का नाही तोहि विचार करावा लागेल.
काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सुध्दा मागणी केली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत तेथील अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना धडा शिकवू असा इशारा त्यांनी दिला आहे. लवकर पाणी सोडले नाही तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मराठवाड्यातील सर्व आमदार बहिष्कार टाकतील असा इशारा आमदार सिरसाट यांनी दिला आहे.
माजी आमदार अर्जुन खोतकर सुध्दा यावेळी रस्ता रोको आंदोलनात उतरले. त्यांनी सांगितले जायकवाडीत वरच्या धरणातून पाणी सोडण्याचे आदेशाची अंमलबजावणी होत नसेल. पाणी रोखणारे नेत्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे. मराठवाड्यातील जनतेने वरची धरणे बांधण्यासाठी विरोध केला नाही. नियमानुसार मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. जलसंपदा विभागाचे अधिकारी जोपर्यंत पाणी सोडणार नाही हे आंदोलन मराठवाड्यात असेच अक्रामकपणे सुरू राहणार अशी भुमिका त्यांनी मांडली.
यावेळी पाथ्रीचे आमदार सुरेश वरपुडकर, परभणीचे आमदार राहुल पाटील, घनसावंगीचे आमदार राजेश टोपे, जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर, औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय सिरसाट, जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल, माजीमंत्री अनिल पटेल, मराठवाडा हक्क परिषदेचे डॉ. शंकरराव नागरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ कल्याण काळे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, सुधाकर सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, गजानन बारवाल, काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, एमआयएमचे नेते नासेर सिद्दीकी, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, माजी नगरसेवक फेरोज खान व हजारो शेतकरी, उद्योजक व नागरीकांनी रस्ता रोको आंदोलन सहभाग घेतला.
जोपर्यंत नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील धरणांचे हक्काचे पाणी सोडणार नाही तोपर्यंत जन आंदोलन सुरू राहणार असे यावेळी सांगण्यात आले.
आंदोलक अक्रामक होत असताना व वाहतूकीला खोळंबा होत होता. वाहनधारकांना त्रास होत असल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन जीन्सी पोलिस ठाण्यात नेऊन सोडू
न दिले.
What's Your Reaction?