कटकट गेट येथील नाला दुर्गंधीमुक्त होणार, खासदार इम्तियाज जलील यांनी केले उदघाटन
कटकट गेट येथील नाला दुर्गंधीमुक्त होणार, खासदार इम्तियाज जलील यांनी केले उदघाटन
औरंगाबाद, दि.30(डि-24 न्यूज) कटकट गेट, इस्लाम दरवाजा नाल्यावर सिमेंट काँक्रीटीकरण करुन झाकले जाणार असल्याने परिसर दुर्गंधीमुक्त होणार आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्या निधीतून हे काम होणार असल्याने येथे सौंदर्यात वाढ होणार आहे. परिसरातील माजी नगरसेवकांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते या सिमेंट काँक्रीटीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले 2014 मध्ये मी आमदार असताना येथे नेहमी वाहतूक कोंडी होत होती. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्ता पार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. जेष्ठ नागरिक व महिलांना त्रास सहन करावा लागत होता. ऐतिहासिक गेटच्या दोन्ही बाजूला रस्त्याच्या कामाला गती येत नव्हती. डिपिसी बैठकीत प्रश्न उपस्थित करुन कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. दोन्ही बाजूला रस्ता बनवण्यासाठी मनपा प्रशासनाने भुसंपादनाची प्रक्रिया केल्यानंतर विकास कामा पूर्णत्वास आले. कामाला गती आली व रस्ते पण चकचकीत केले यामुळे येथील नागरिकांची नेहमीचा त्रास दूर झाला. एमआयएमने वार्डातील विकास कामांकडे लक्ष दिले यासाठी येथील नागरिकांचा नेहमी प्रतिसाद मिळाला. नाल्याचे सिमेंट काँक्रीटीकरण झाल्यावर मनपा प्रशासनाने लक्ष घालावे. यामध्ये तुटलेल्या पुलाचे काम पण केले जाईल. यावेळी येथील जनतेचे त्यांनी आभार मानले.
याप्रसंगी एमआयएमचे शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी, माजी नगरसेवक अब्दुल अजीम, सलिम सहारा, आरेफ हुसेनी, शेख अहमद, अज्जू रहीम नाईकवाडी, शेख रफीक, रफीक पालोदकर, इर्शाद खान, फेरोज खान व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?