नॅचरोपॅथी कौन्सिल स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार - डॉ.परवेझ हनतोष

 0
नॅचरोपॅथी कौन्सिल स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार - डॉ.परवेझ हनतोष

नॅचरोपॅथी कौन्सिल स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार - डॉ.परवेझ हनतोष

औरंगाबाद, दि.19(प्रतिनिधी) सरकार नॅचरोपॅथीला प्रोत्साहन देत आहे. नॅचरोपॅथी उपचारांवर रुग्णांचा विश्वास दृढ होत आहे. केंद्र व राज्य सरकार आयुष्यमान भारत अंतर्गत या उपचार पद्धतीला प्राधान्य देत असल्याने सरकार दरबारी केंद्रीय व राज्यस्तरीय कौन्सिल बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिवसेना अल्पसंख्याक डॉक्टर सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.परवेझ हनतोष यांनी आपल्या भाषणात दिले आहे.

शनिवारी मौलाना आझाद संशोधन केंद्रात आयोजित सहावे राष्ट्रीय निसर्गोपचार दिवस कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

कार्यक्रमाचे आयोजन सुर्या फाऊंडेशन, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन मराठवाडा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी आयुष्यमान मंत्रालय भारत सरकार, शिवसेना अल्पसंख्याक डॉक्टर सेल, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्गोपचार दिवस साजरा केला.

व्यासपीठावर डॉ.पल्लवी, मराठवाडा अध्यक्ष तथा आयोजक डॉ.शेख शकील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारोती म्हस्के, जिल्हा आयुष्यमान अधिकारी जालना डॉ.कुलदीप वाघपांजर, प्राचार्य शेख सलिम, डॉ.लक्ष्मन माने, डॉ.शेख अकबर, डॉ.मनोज उपस्थित होते. 

पहिल्या सत्रात योग, नॅचरोपॅथी, मधुमेह, नाडी, महिलांच्या मासिक पाळी आजारांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले.

नोबेल वोकेशनल ट्रेनिंग सेंटर DNYS उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या प्रॅक्टीसनर्स यांना भारतरत्न डॉ.एपिजे अब्दुल कलाम आरोग्य सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये डॉ.पल्लवी दळवी, शेखर खोले, डॉ.अनिस शहा, वैद्य सुरेंद्र नाटेकर, डॉ.आसेफ महेबुब शेख, डॉ.रशिद शहा, कृष्णानंद महाराज शहाणे, डॉ.दत्तात्रय गोंगे, डॉ.मोहंमद अमीर शेख, किरण टेमकर, सचिन सावंत यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

निसर्गोपचार सेवा देणाऱ्या प्रॅक्टीसनर्सना राष्ट्रपिता महात्मा गांधी निसर्गोपचार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सुत्रसंचलन डॉ.शेख शकील यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ.लक्ष्मण माने यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.रामहरी पोखरे, डॉ.आमेर पठाण, डॉ.असलम शहा, डॉ.कैलास गोरे, डॉ.रईस शेख, डॉ.तारेख काझी, फैसल एजाज, डॉ.गौसिया नाज, नाजेमा रहेमान, कल्याणी राऊत, डॉ.अ.करीम, डॉ.रफीक, डॉ.निसार तांबोळी, शेख अशिर यांनी परिश्रम घेतले.

डॉ.शेख शकील यांनी KBSR कौन बनेगा आरोग्य रक्षक या प्रतियोगितेसाठी सहभाग घेण्याची विनंती केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow