आयटकने काढली कामगारांच्या मागणीसाठी पदयात्रा
आयटकने काढली कामगारांच्या मागणीसाठी पदयात्रा...
औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज) घाटीतील कामगारांच्या विविध मागणीसाठी आयटकने घाटी ते कामगार उपायुक्त कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून निवेदन दिले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय औरंगाबाद येथे कथीत कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस, आठवडी सुट्टी व किमान वेतन दिले जात नाही. अनेकदा विनंत्या करुनही दर महीन्याच्या 10 तारखेपर्यंत पगार होत नाही. 15 दिवस उशीराने पगार दिला जातो. अनेकवेळा त्यापेक्षा जास्त उशीर होतो. अगोदरच तोकडा पगार त्यात प्रचंड महागाई असतांना कथीत कंत्राटी कामगारांनी जगायचे कस असा प्रश्न आहे. किमान वेतन समान वेतन व आठवडी सुट्टी देखील दिली जात नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय औरंगाबाद येथील कारभार डॉक्टरांच्या हातात आहे, डॉक्टरांचा आम्ही सन्मान करतो, म्हणून गेल्या अनेक वर्षांपासुन आम्ही त्यांना नम्रपणे संधी देत आहोत, तरी देखील आश्वासना व्यतिरिक्त काहीही मिळालेले नाही. कारभारात सुधार झालेला नाही, डिन बदलतात परंतू ढिसाळ कारभार तसाच आहे. आम्ही जरी भरपुर 'वेळ दिला असला तरी महागाई आणि उपासमारी ही कामगारांना वेळ देणार नाही. त्यामुळे कामगारांवर आर्थिक मानसीक प्रचंड तान आहे.
आजपासुन घाटी हॉस्पीटल पासुन आपल्या कार्यालयापर्यंत पदयात्रा काढुन आंदोलनास सुरवात करीत आहोत. तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय औरंगाबाद येथे कथीत कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस, आठवडी सुट्टी व किमान वेतन न देणा-या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय औरंगाबाद, प्रशासनावर गुन्हा दाखल करणे व इतर कायदेशीर कारवाई करावी ही नम्र विनंती. अन्यथा नाईलाजास्तव यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
यावेळी एड अभय टाकसाळ, काॅ.प्रकाश उर्फ नरहर देसले, गजानन खंदारे, काॅ. प्रकाश बनसोडे, किरणराज पंडित, भालचंद्र चौधरी, विकास गायकवाड, अमोल सरवदे, पंकज चव्हाण, संदीप पेठे, शिवाजी फुलवळे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?