परदेशात उच्च शिक्षणासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजना, मराठा कुणबी विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

 0
परदेशात उच्च शिक्षणासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजना, मराठा कुणबी विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

परदेशात उच्च शिक्षणासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजना; मराठा कुणबी विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज)- मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी ‘महाराजा सयाजीराव गायकवाड – सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना’ शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन उपव्यवस्थापकीय संचालक, सारथी विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

अर्ज कालावधी:-

इच्छुक विद्यार्थ्यांनी सारथीच्या https://fs.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर विहीत नमुन्यात ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ जून २०२५ आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी Spring २०२५ (एप्रिल/मे), Fall २०२५ (जुलै/ऑगस्ट/सप्टेंबर २०२५) आणि Spring २०२६ (जानेवारी ते मार्च २०२६) या कालाधीत प्रवेश घेणारे विद्यार्थी अर्ज करु शकतात.

उद्देश आणि व्याप्ती :- 

        ही योजना मराठा, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील विद्यार्थ्यांना पदरेशात पदव्यूत्तर पदवी, पदव्यूत्तर पदविका आणि पीएचडी Qs World University Ranking मध्ये २०० च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. यामध्ये ५० जागा पदव्यूत्तर पदवी / पदविका आणि २५ जागा पीएच.डी च्या विविध अभ्यासक्रमासाठी राखीव आहेत.

शिष्यवृत्तीचे स्वरुप :- 

योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शुल्क, निर्वाह भत्ता आणि वैयक्तिक आरोग्य विमा यासाठी आर्थिक सहाय्य मिळते. प्रति वर्ष पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल ३० लाख रुपये आणि पीएच.डी अभ्यासक्रमासाठी कमाल ४० लाख रुपये या मर्यादेत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.

नागरिकत्व आणि रहिवासः- लाभार्थी हा मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठ-कुणबी जातीतील महाराष्ट्राचा रहिवासी आणि भारतीय नागरिक असावा.

शैक्षणिक पात्रताः- पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५५% गुणासह पदवी उत्तीर्ण असावी.

वयोमर्यादाः- पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल वय ३५वर्षे आणि पीएच.डी साठी ४० वर्षे

उत्पन्न मर्यादाः-– कुटुंबाचे मागील आर्थिक वर्षातील सर्व मार्गानी प्राप्त एकूण वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे.

विद्यापीठ प्रवेश पात्रताः- Qs World University Ranking 200 या आत असलेल्या परदेशी विद्यापीठात पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी Unconditional Ofter Letter असणे आवश्यक

आवश्यक कागदपत्रेः- विहित नमुन्यातील अर्ज, सक्षम प्राधिकाऱ्याचा याचा उत्पन्नाचा दाखला आणि ITR (२०२५-२६) Form No.१६,दहावी, बारावी, पदवी, पदव्यूत्तर पदवीच्या गुणपत्रिका, इतर आवश्यक दाखले,परदेशी विद्यापीठाचे Unconditional Offer Letter,विद्यापाठाच्या Prospectus ची प्रत,अद्यावत Qs World University Ranking ची माहिती.

विशेष सुचनाः-विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्रासाठी प्रगती अहवाल आणि खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्रे सादर केल्यास फौजदारी कारवाई आणि खर्चाची व्याजासह वसुली केली जाईल.

संपर्कः-अधिक माहितीसाठी सारथीच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधवा किंवा सारथीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. सारथी कार्यालय संपर्क साधावा ०२०-२५५९२५०७.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow