आमखास मैदानावर वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचे काम सुरू केल्याने खळबळ, इम्तियाज जलील यांनी काम थांबवले...!

आमखास मैदानावर वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचे काम सुरू केल्याने खळबळ, इम्तियाज जलील यांनी काम थांबवले...!
काम सुरू केल्याने एमआयएम अक्रामक... खोदकाम थांबवले...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) ऐतिहासिक आमखास मैदानावर वक्फ बोर्डाच्या तीन कार्यालयाचे कामाची सुरुवात सार्वजनिक बांधकाम विभागाने करण्यासाठी आज खड्डे खोदण्यासाठी काम जेसीबीने सुरू केले असता एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील व कार्यकर्त्यांनी हे काम रोखले आहे. कोणत्याही प्रकारे मुस्लिम समाज येथे कार्यालय होऊ देणार नाही. येथे खेळण्यासाठी मैदान आहे मैदानच राहणार. अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार होते तेव्हा इम्तियाज जलील यांनी प्रयत्न केले असता येथे इंटरनॅशनल फुटबॉल स्टेडियम उभारण्यास शासनाने मंजूरी दिली. मनपा प्रशासनाने प्रस्ताव शासनाकडे पाठवला. वक्फ बोर्डाने एनओसी दिली होती. निधी उपलब्ध झाला नसल्याने स्टेडियमचे काम सुरू होऊ शकले नाही. गुपचूप टेंडर काढून येथे कार्यालयाचे बांधकाम सुरू केले हा अन्याय मुस्लिम समाज सहन करणार नाही. मुस्लिम समाजाच्या खेळाडूंना खेळण्यासाठी मैदान नाही. वक्फ बोर्डाची महाराष्ट्रात 93 हजार एकर जमीन आहे. शहरात सुध्दा शेकडो एकर जमीन वक्फ बोर्डाची आहे तेथे कार्यालय बांधावे. येथे काम सुरू केले तर होऊ देणार नाही असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे. यावेळी शेकडो एमआयएमचे कार्यकर्ते काम थांबवण्यासाठी दुपारी जमा झाले होते.
डि-24 न्यूजने महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे चेअरमन समीर काझी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले आमखास मैदान सर्वे नंबर 210 मध्ये 29 एकर 9 गुंठे हि जमीन वक्फ बोर्डाची आहे. त्यापैकी काही जागेवर वक्फ बोर्डाच्या कार्यालय बांधकाम सुरू केले आहे. वक्फ बोर्डाच्या बैठकीत कार्यालय बांधण्याचा
निर्णय घेतला आहे. खेळाचे मैदान येथून दूर आहे. एका बाजूला काम सरकारच्या परवानगीने सुरू केले आहे. काम बंद करण्यात आले त्याबद्दल माहिती नाही माहिती घेतल्यानंतर सांगतो असे त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?






