मुख्यमंत्री कोण होणार यावर भाष्य टाळावे - जयंत पाटील

 0
मुख्यमंत्री कोण होणार यावर भाष्य टाळावे - जयंत पाटील

मुख्यमंत्री कोण होणार यावर भाष्य टाळावे - जयंत पाटील....

सरकारकडून आश्वासनांचा पाऊस कमेंटमेट नाही, अधिवेशनात चहा पाण्यावर बहीष्कार , आचारसंहितेवर केले भाष्य....

छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.26(डि-24 न्यूज) आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी भवनात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री कोण होणार यावर भाष्य करणे टाळावे. यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वारस्य ठेवू नये. मी सत्तेवर आले पाहिजे हे स्वारस्य असले पाहिजे. यामुळे आमच्या महाविकास आघाडीतील तीनही पक्षात स्पर्धा लागू नये. नावे घोषित केल्याने महाविकास आघाडीत गॅप तयार होईल. त्यामुळे असले भाष्य करु नये असा सल्ला जयंत पाटील यांनी दिला आहे.

राज्याचे अधिवेशन सुरू होणार आहे. महाविकास आघाडी चहापाण्यावर बहिष्कार टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकार फक्त आश्वासन देत आहे. कमिटमेंट काही नाही. आमदार सांभाळण्यासाठी झालेले डैमेज कंट्रोल करण्यासाठी सरकार पाहिजे ते आश्वासन देत आहे.

एका एका आमदाराच्या मतदारसंघात हजार ते पाच हजार कोटींच्या कामाचे आश्वासन दिले आहे.

त्या बजेटची बेरीज केली तर महाराष्ट्र शासनाचे तीन वेळा बजेट मांडावे लागेल. त्या भागातील जनतेची फसवणूक करण्याचा प्रकार आहे. विकास कामांचे नारळ फोडने कमिशन घेणे यापलिकडे कमिंटमेट काही नाही असा जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागेल आणि 20 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुका होईल असे भाकीत त्यांनी केले. 20 ऑगस्ट नंतर निवडणुकीचा मूड असेल यामुळे सरकारने जाहीर केलेल्या गोष्टी पार पाडण्यासाठी वेळ मिळणार नाही. सर्व गोष्टी कागदावर राहतील. उद्यापासून सुरु होणा-या अधिवेशनात पेपरफुटी पासून सरकारने केलेल्या अनेक अक्षम्य त्रुटीबाबत महाविकास आघाडीचे आमदार सरकारला जाब विचारतील. शेतकऱ्यांचा पिकविमा योजना हि नफेखोरीला प्रोत्साहन देणारी आहे. सगळे पीक विमा कंपन्यांनी हजारो कोटी रुपयांचा नफा मिळवला. शेतकऱ्यांच्या पदरी काही पडले नाही हे सरकारचे मोठे अपयश आहे. सरकारमधील कोणीही जिव्हाळ्याने प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत नाही. महाराष्ट्र ड्रग्सच्या विळख्यात सापडला असून युवकांपर्यंत सहज ड्रग्स पुरवठा करणा-यांना गृहखात्यातील पोलिस सहकार्य करतात हे मोठे नेक्सस तयार झाले आहे. तरुण पिढीला पब आणि ड्रग्स या दोन संस्कृतीचा विळखा बसतोय. गृहखाते हे थांबवण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करुन प्रोत्साहन देत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

घरवापसीच्या प्रश्नावर त्यांनी गोलमाल उत्तर दिले. महाविकास आघाडीतील पक्षनेत्यांची जागा वाटपाबाबत बैठक 25 जूनला होणार होती पण काँग्रेस पक्षाची दिल्लीला बैठक असल्याने झाली नाही नवीन तारीख लवकरच ठरवली जाणार आहे. तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ. कोण कीती जागेवर विधानसभा निवडणुक लढणार कुठल्याच पक्षाने जाहीर करण्याची आवश्यकता नाही. निवडून येणारा उमेदवार, सक्षमता त्या भागातील जनतेचा पाठिंबा व लोकसभा निवडणुकीचाही विचार जागावाटपात करण्यात येईल. उमेदवार कोण व कोणत्या समाजातील असेल यावर अवलंबून असेल असे पाटील म्हणाले.

यावेळी माजीमंत्री राजेश टोपे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, मुश्ताक अहमद, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, इलियास किरमानी आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow