समाजवादीची निवडणुकीची तयारी, कार्यालयात घेतली बैठक

 0
समाजवादीची निवडणुकीची तयारी, कार्यालयात घेतली बैठक

समाजवादीची निवडणुकीची तयारी, कार्यालयात घेतली बैठक

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) -

आगामी महापालिका निवडणुकीच्या पुर्व तयारीसाठी समाजवादी पार्टीने शहागंज येथे पक्षाचे प्रदेश महासचिव अब्दुल रऊफ यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिका-यांची बैठक घेतली.

या बैठकीच्या अगोदर नवनियुक्त महानगर अध्यक्ष अयूब पटेल, महीला जिल्हाध्यक्ष प्रीती दुबे, युवकचे अध्यक्ष सलमान मिर्झा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोहंमद जैद कुरेशी यांनी पक्षात प्रवेश केला.

यावेळी मार्गदर्श़न करताना अब्दुल रऊफ यांनी सांगितले कार्यकारीणी घोषित करुन पक्षसंघटना मजबुत करावी. पक्षाचे विचार ध्येय धोरण जनतेपर्यंत पोहचवा. समाजवादी पार्टी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली देशात तिस-या नंबरचा पक्ष म्हणून समोर आला आहे. आमदार तथा प्रदेशाध्यक्ष अबु असिम आझमी जनसामान्यांचे प्रश्न विधानसभेत व बाहेर मांडत आहे. त्यांचे हात आपल्याला पक्ष संघटनेचा विस्तार करुन बळकट करायचे आहे. शहरात अतिक्रमण व रस्ते रुंदीकरणाच्या नावावर गरीबांची घरे पाडली जात आहे. विशेष घटकांच्या व्यवसायावर गदा आणली जात आहे. शहराचा पाणी प्रश्न सुटलेला नाही. रस्ते, ड्रेनिज व अनेक नागरी सुविधांवर रस्त्यावर उतरुन आंदोलन करुन जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सक्रीय व्हावे. असे पदाधिका-यांना त्यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी प्रदेश सचिव रियाजोद्दीन देशमुख, एड गुफरान, डाॅ.शरीफ, डाॅ.मुश्ताक सिद्दीकी, युवा उपाध्यक्ष शेख रिझवान आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow