अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.30(डि-24 न्यूज)- सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात राज्यातील अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या प्रसिद्धी करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.6 सप्टेंबर असून अर्ज आयुक्त, समाज कल्याणआयुक्तालय महाराष्ट्र राज्य, 3, चर्चपथ, पुणे-1 यांच्याकडे सादर करावयाचे आहेत. तरी अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पी.जी.वाबळे यांनी केले आहे.
What's Your Reaction?